Published On : Mon, Jan 27th, 2020

हेडकॉन्स्टेबलचा शिक्षा बदलीविरुद्ध आत्मदहनाचा इशारा

तक्रारपत्र व्हायरल झाल्याने शहर पोलिस दलात खळबळ

नागपूर: उपराजधानीतील हुडकेश्वर पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल संदीप गुंडलवार यांनी तेथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाघमारे यांना अर्ज लिहून २८ जानेवारीला हुडकेश्वर पोेलिस ठाण्यात आत्मदहनाचा इशारा दिला आहे. कर्तव्यात कोणताही कसूर नसताना पोलिस आयुक्त कार्यालयाने आपणास पोलिस मुख्यालयात तडकाफडकी बदली केल्याने आपण दुखावलो असून यातून आपण आत्मदहन करण्याच्या विचारावर पोहोचलो असल्याने त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हे पत्र आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागपूर शहर पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे. माहितीप्रमाणे, मागील आठवड्यात हुडकेश्वर आणि सक्करदरा पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या चेन स्नॅचिंग गंभीर प्रकरणांमुळे शहर पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या आदेशानी दोन्ही पोलिस ठाण्यातील डी.बी. स्कॉडची पोलिस मुख्यालयात तातडीने बदली करण्यात आली होती. यानंतर डीसीपी निर्मलादेवी (परिमंडळ क्र. ४) यांनी प्रकरणात मध्यस्थी करत बदली करण्यात आलेल्या दोन्ही डी.बी. स्कॉडमधील कर्मचाऱ्यांना परत पोलिस ठाण्यात नियुक्ती दिली. मात्र, असे करताना त्या कर्मचाऱ्यांना कामगिरी करून दाखविण्याची अटही घालण्यात आली. यानंतरही गुंडलवार यांनी तक्रारपत्र लिहिल्याने पोलिस दलातील वरिष्ठांनी त्यांच्याविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याची तयारी दर्शविली आहे.

Advertisement
Advertisement