Published On : Thu, Jan 16th, 2025
By Nagpur Today Nagpur News

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 57 प्रकरणांची नोंद

उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (15) रोजी शोध पथकाने 57 प्रकरणांची नोंद करून 32,000/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 13 प्रकरणांची नोंद करून 5,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 300 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 800/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली.

वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 18 प्रकरणांची नोंद करून 16,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून 3,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 4 प्रकरणांची नोंद करून 4,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. श्री. गुरू अर्पाटमेंट यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्या कडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोन अंतर्गत मे. इसीन्स्‍ा बेकरी ॲड कॅफे यांनी कचरा जवळपासच्या रस्त्याच्या कडेला पसरल्यामुळे 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमाननगर झोन अंतर्गत मे. ग्राहक शॉपी किराणा ॲड जनरल स्टोअर्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धंतोली झोन अंतर्गत श्री. रोहन कांबळे यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. चित्रा स्वीट्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला.

Advertisement

सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. जय बजरंग स्वीट्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. लकडगंज झोन अंतर्गत श्री. भगतराम रावलदास यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्या कडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोन अंतर्गत श्री. पविन भालणि यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्या कडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 8 प्रकरणांची नोंद करून रू. 55,000/- दंड वसूल केला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.