Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

  Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, May 20th, 2020

  सुभान नगर जलकुंभ येथे फ्लो मीटर बसविण्यासाठी १२ तासांचे शटडाऊन २१ मे रोजी

  नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी सुभान नगर मुख्य वितरण वाहिनीवर ६०० मिमी चे फ्लो मीटर बसविण्यासाठी २१ मे गुरुवार रोजी १२ तासांचे शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

  शटडाऊन २१ मे रोजी सकाळी १० वाजता सुरु होऊन रात्री १० वाजता संपेल. सुभान नगर जलकुंभ भागातील खालील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील:

  पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: शिक्षक कॉलोनी, आभा कॉलोनी, नरहरी सोसायटी, महादेव नगर, गुलमोहर नगर, धनलक्ष्मी सोसायटी, जय गंगा मा हाऊसिंग सोसायटी, विकासानंद सोसायटी, कीर्तीधर लेआऊट, घासीदास नगर, नशेमन सोसायटी, तलमले लेआऊट, ओम नगर, न्यू हनुमान नगर, विदर्भ भूमी लोक कल्याण सोसायटी, भरतवाडा, भगत नगर.

  बाधित भागांना टँकरद्वारे पाणीपुरवठा देखील शक्य होणार नसल्याने मनपा-OCW यांनी वरील भागातील नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याची विनंती केली आहे.

  नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.

  For any other information or complaints regarding water supply please contact NMC-OCW Toll Free Number: 1800-266-9899

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145