Published On : Fri, May 29th, 2015

नागपूर : परिवहन समितीची बैठक, तीन विषयास मंजुरी

Parivahan Samiti Meeting photo 29 may 2015
नागपूर। नागपूर महानगर पालिका चे परिवहन समीती ची सभा आज सकाळी मनापा च्या स्थायी समिती सभागृह समितीचे सभापती सुधीर (बंडू) राउत यांच्या अध्यक्षखाली संपन्न झाली. या बैठकीत तीन विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये शहर परिवहन व्यवस्थेत सुधारणे करिता नवीन १२५० बसेस खरीदी करण्या बाबत केंद्र शासने अधिनियामाअंतर्गत केंद्रीय वित्तीय सहायता उपलब्ध करून घेण्याकरिता लागणारा खर्चाचा विस्तृत आरखडा अभियानचा टुलकीट आणि गाईडलाईन प्रमाणे तयार करण्याकरिता स्थायी समिती ठराव क्र. ६८८, २७/०२/२००९ अन्वये मे. दिनेश राठी अंड असोसीएट कंपनी नागपूर या तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती बसेस किमतीच्या १.२५  टक्के दरावर मान्यता प्राप्त असून त्याच धर्तीवर अतिरिक्त काम करावयाचे असल्यामुळे मे. दिनेश राठी अंड असोसीएट कंपनी नागपूर या तांत्रिक सल्लागाराची पूर्वीचे मंजूर दरावर ४० टक्के कमी दरावर सूट देऊन विस्तृत आरखडा तयार करवून घेण्याकरिता मान्यता प्रदान करण्यात आली.

तसेच इथेनॉल संचालित बस संचालाबातच्या कालावधी कराराप्रमाणे ३ महिने म्हणजेच २४/०८/२०१४ ते २०/११/२०१४ रोजी पर्यतचा होता व त्यानंतर मे. स्कोनिया कंपनी टप्पा वाहतूक संचालना अंतर्गत ग्रिन बसच्या पर्फ़ोर्मन्स इवलूषण करिता ६ महिन्याचा कालावधी वाढवून देण्यास सादर केलेल्या प्रस्तावास महानगरपालिकाके ने २१/०५/२०१५ रोजीपावेतो मुदतवाढ दिलेली आहे. मे. स्कोनिया कंपनी पुहाश्चः ६ महिने मुदत वाढीबाबत सादर केलेल्या प्रस्तावाला अनुसुरून सभापती यांनी सदर प्रस्तावास २०/०५/२०१५ रोजी तत्वतः मान्यता प्रदान करून आगामी परिवहन समितीचे सभेत माहितीकरिता हा विषय ठेवण्यात यावा, असे निर्देशित केले होते. त्यासाठी देखील समिती ने मंजुरी प्रदान केली.

त्याचप्रमाणे परिवहन विभागातील आस्थापना पदनिर्मीती प्रक्रियेस लागणारा कालावधी तसेस विभागीय कामामध्ये झालेली प्रचंड वाढ लक्षात घेता व परिवहन विभागाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने सध्या कार्यरत कंत्राटी पदा अंतर्गत असलेले कर्मचारी वर्ग यांना दोन दिवसाचा खंड देऊन त्यांचे मंजूर मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात पुढील ६ महिन्याचे कालावधीकरिता ठेवण्याचे मान्यतेबाबतचा प्रश्न विचारात घेऊन त्यास एकमताने मंजुरी प्रदान करण्यात आली. बैठकीला परिवहन समिती उपसभापती दिव्या धुरडे, स्थायी समिती सभापती व पदसिद्ध सदस्य रमेश सिंगोरे, सदस्य महेंद्र राउत, मुरलीधर मेश्राम, सुमित्रा जाधव, उपायुक्त व परिवहन व्यवस्थापक संजय काकडे, प्रशासकीय अधिकारी कांती सोनकुसरे, प्रमुख लेखा तथा वित्त अधिकारी मदन गाडगे, सुकीर सोनटक्के आदी उपस्थित होते.