Published On : Sat, Apr 1st, 2017

महापौरांनी घेतली पोलियो उपक्रम अभियानाची आढावा बैठक

नागपूर: येत्या २एप्रिल रोजी होणाऱ्या पोलिओ अभियानाची आढावा बैठक शुक्रवारी महापौर नंदा जिचकार यांनी घेतली. या बैठकीला आरोग्य समिती सभापती मनोज चाफले, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिव्हाने, डॉ. विजय जोशी, डॉ. प्रदीप दासरवार आदी उपस्थित होते.

नागपुरात एकूण 1252 जागी पोलियो बुथ असणार असून त्याचा दुसरा 3 ते 10 एप्रिल पर्यंत जे बालक या पासून वंचीत राहील त्यांच्या घरी जाऊन पोलियो डोज देण्याची सोय करा व त्याचा गोषवारा तयार करून दोन दिवसात मला सादर करा असे जेणे करून तक्रारीला वाव रहाणार निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या अभियानात सर्व नगरसेवकांचा सहभाग घ्यावा आणि सकाळी 8 ते 5 पर्यंत उघडेच राहील असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच वाढत्या उन्हाची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.