Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jul 22nd, 2020

  नागपुरात तिघांचा मृत्यू, १२२ पॉझिटिव्ह

  नागपूर : नागपूर जिल्ह्यात बुधवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला, तर १२२ नमुने पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत मृतांची संख्या ६३ झाली असून, कोरोनाच्या एकूण संक्रमितांची संख्या ३२९३ झाली आहे. आज झालेल्या पॉझिटिव्हमध्ये शहरातील ६४ व जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ५८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. यात विशेष बाब म्हणजे १३२ लोक निरोगी होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण २११३ रुग्ण निरोगी होऊन परतले आहेत. अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या १११९ आहे.

  मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान कामठी येथील ६० व ५४ वर्षीय महिला पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला. दोन्ही रुग्णांना न्यूमोनिया होता. श्वास घेण्यास त्रास होत होता. मेडिकलमध्ये भरती असलेल्या धंतोली येथील ७५ वर्षीय पुरुषाचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. त्याला २० जुलै रोजी भरती करण्यात आले होते. सर्दी, ताप व श्वास घेण्यास त्रास होत होता. हायपरटेंशनसोबतच डायबिटीजसुद्धा होते. बुधवारी सायंकाळी ५ वाजता मेयोच्या लॅबमधून २९, मेडिकल येथून ५, एम्स १६, नीरी ४, खासगी लॅब ४२, अ‍ॅन्टिजन टेस्ट २६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज एकूण २२१९ नमुने घेण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यात ५३,५०६ नमुने घेण्यात आले आहेत. एकूण संक्रमित ३२९३ मधून ७२६ नागपूर ग्रामीणचे व ९३ संक्रमित जिल्ह्याबाहेरचे आहेत.

  येथे सापडले रुग्ण

  महापालिकेतर्फे बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची माहिती देण्यात आली. यात धंतोली येथील ७, भारतनगर ३, हनुमाननगरात १, झिंगाबाई टाकळी १, काटोल रोड ३, हंसापुरी १, सहयोगनगर १, समतानगर १, जागृतीनगर १, गोरेवाडा २, राजीवनगर अजनी ४, शांतिनगर २, सोनेगाव १, स्मॉल फॅक्टरी एरिया १, काचीपुरा १, कडबी चौक १, विदर्भ हाऊसिंग बोर्ड १, निर्मल नगरी १, आनंदनगर जयताळा १, म्हाळगीनगर १, टिळकनगर १, ओएफएजे डिफेन्स १, दिघोरी १, मोहननगर १, नरेंद्रनगर १, गंगाबाई घाट १, तीन नल चौक १, भानखेडा २, तांडापेठ १, तीन खंबा १, गणेशपेठ १, शताब्दीनगर १, मोठा ताजबाग १, शिवाजीनगर १, प्रगतीनगर १, रामकृष्णनगर १, मानकापूर १, लक्ष्मी अपार्टमेंट धरमपेठ १, पोलीसनगर हिंगणा रोड १, सूर्यनगर १, अजितनाथ सोसायटी शताब्दीनगर १, कपिलनगर नारा १, कॉपोर्रेशन कॉलनी १, पुष्पांजली अपार्टमेंट ३, गुलशननगर १ आणि शहराच्या बाहेरच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. तसेच ग्रामीण भागात ५८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात कामठीमध्ये २७, कन्हान ११, काटोल २, रामटेक २, बुटीबोरी ४, हिंगणा ६, खापा २; तसेच उमरेड, कुही, बोखारा आणि पारशिवनी येथे प्रत्येकी १ पॉझिटिव्ह रुग्णाचा समावेश आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145