Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Aug 5th, 2018

  ग्यानदा कोंडे, स्वस्तीका ठाकूर’व्हाईस ऑफविदर्भ’ चॅम्पियन

  नागपूर: नागपूर महानगरपालिका आणि लकी म्यूझिकलइवेंट्सच्या संयुक्त विद्यमानेआयोजित ‘व्हाईस ऑफ विदर्भ’च्या उत्कंठावर्धक ‘मेगा फायनल’मध्ये १४ वर्षाखालील गटात ग्यानदा कोंडे व १४ वर्षावरील गटात स्वस्तीका ठाकुर चॅम्पियन ठरली.शनिवारी (ता. ४) रेशीमबाग येथीलकविवर्य सुरेश भट सभागृहात ‘व्हाईसऑफ विदर्भ’ स्पर्धेची ‘मेगा फायनल’झाली. यामध्ये दोन्ही गटातील एकूण २३स्पर्धकांनी जेतेपदाच्या मुकुटासाठीआव्हान दिले होते. यात १४ वर्षाखालील गटात ग्यानदाने प्रथम तर सुमेधा बालपांडेने द्वितीय व मिताली कोहोडने तिसऱ्या स्थानावर बाजी मारली. १४ वर्षाखालील गटात स्वस्तीकाने पहिले, प्रजोत देशमुखने दुसरे व श्रिया मेंढीने तिसरे स्थान राखले.

  स्पर्धेच्या अंतिम फेरीदरम्यान महापौर नंदा जिचकार यांनी कविवर्य सुरेश भट सभागृहात भेट देऊन स्पर्धकांना प्रोत्साहित केले. यावेळी मनपा शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, जलप्रदाय समिती उपसभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक संजय चावरे, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी आदी उपस्थित होते.

  कविवर्य सुरेश भट यांच्या स्मृतिप्रीत्यर्थविदर्भातील प्रतिभावंत गायक कलावंतांनाव्यासपीठ उपलब्ध करूनदेण्यासाठी ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ स्पर्धाआयोजित करण्यात आली. १४वर्षाखालील व १४ वर्षावरील अशा दोनगटात आयोजित स्पर्धेमध्ये विदर्भातीलउदयोन्मुख व प्रतिभावंत गायककलावंतांनी सहभाग घेतला होता.सुरूवातीला स्पर्धेची प्राथमिक फेरीघेण्यात आली. प्राथमिक फेरीतून दोन्हीगटातील १२७ स्पर्धक उपांत्य फेरीसाठीपात्र ठरले होते. उपांत्य फेरीत १४वर्षावरील गटातून १३ स्पर्धकांची तर १४वर्षाखालील गटातून १० अशा एकूण २३स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झालीहोती. निवड झालेल्या २३ स्पर्धकांनीजेतेपदाचे मुकुट पटकाविण्यासाठी शर्थीचेप्रयत्न केले. मात्र अखेर ग्यानदा व स्वस्तीकाने आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने परीक्षकांचा कौल मिळविला. प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या दोन्ही कलावंतांना २१ हजार रुपये रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकासाठी क्रमश: ११ हजार व ७ हजार रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

  स्पर्धेच्या आयोजनासाठी मनपाचे क्रीडासमिती सभापती नागेश सहारे, हर्षलहिवरखेडकर, लकी म्यूझिकल इवेंट्सचेलकी खान आदींनी सहकार्य केले.

  शहरातील पं. जयंत इंदुरकर, गुरुवर्य अखिल अहमद, मोरेश्वर निस्ताने, आर. एस. मुंडले महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. तनुजा नाफडे, सुनील गजभिये, मनिषा देशमुख यांनी अंतिम फेरीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली.

  स्वस्तीका, प्रजोत श्रियाला सा रे गा मा पा मध्ये जाण्याची संधी

  ‘व्हाईस ऑफ विदर्भ’च्या अंतिम फेरी १४ वर्षावरील गटात पहिले तिन्ही स्थान पटकाविणाऱ्या स्वस्तीका ठाकुर, प्रजोत देशमुख व श्रिया ठाकुर या तिन्ही कलावंतांना झी टीव्ही वाहिनीवर सुरू होत असलेल्या सा रे गा मा पा या रिअॅलिटी शो मध्ये गाण्याची संधी मिळणार आहे. झी टीव्ही वर सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वाहिनीतर्फे १६ ते ३५ वयोगटासाठी देशभरात ऑडीशन घेण्यात येणार आहे. यातून निवडण्यात येणाऱ्या देशातील उत्कृष्ट गायकांमधून प्रत्यक्ष कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलावंतांची निवड होणार आहे. ‘व्हाईस ऑफ विदर्भ’ विजेत्या स्वस्तीका, प्रजोत व श्रिया या तिन्ही कलावंतांना सा रे गा मा पा च्या प्राथमिक फेरीत ऑडीशन देण्याची गरज नसून त्यांची निवड देशभरातून निवडण्यात येणाऱ्या उत्कृष्ट स्पर्धकांमध्ये झाली आहे, अशी माहिती लकी म्यूझिकल इवेंट्सचे लकी खान यांनी दिली.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145