नागपूर :शहरातील प्रसिद्ध अंबाझरी तलावाचे बळकटीकरण आणि मजबुतीकरण करण्याच्या कामासंदर्भात नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.
मनपा मुख्यालय येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षात पार पाडलेल्या बैठकीत मनपाचे अतिरिक्त आयुक्त, श्रीमती आंचल गोयल, मुख्य अभियंता श्री.राजीव गायकवाड, नागपूर पाठबंधारे विभाग (दक्षिण) चे मुख्य अभियंता श्री. पवार, अधीक्षक अभियंता, डॉ. श्वेता बनर्जी, मुख्य लेखा अधिकारी श्री. सदाशिव शेळके, उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूरचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते
बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अंबाझरी तलावाच्या बळकटीकरण आणि मजबुतीकरण करण्याच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी अंबाझरी आउटलेट आणि पुढील ५० मीटर परिसरातील पाणीच्या प्रवाहाला होणारी अडचण, अंबाझरी धरण परिसरातला धोका, परिसारत असणाऱ्या वृक्षांची माहिती जाणून घेतली. तसेच तांत्रिकबाबी आणि इतर कार्याबाबत पाठबंधारे विभागामार्फत बळकटीकरण आणि मजबुतीकरण या संदर्भात डिझाईन तयार करू घ्यावे असे निर्देश दिले.
अंबाझरी परिसारत असणाऱ्या वृक्षांची माहिती जाणून घेण्याकरिता अतिरिक्त आयुक्त (शहर), मुख्य अभियंता पाठबंधारे विभाग, मनपाचे उद्यान विभागाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी यांचा समावेश असणारी लहान समिती स्थापन करावी आणि या समितीने पुढील १५ दिवसात आपला अहवाल सदर करावा असे निर्देशही डॉ. चौधरी यांनी दिले.
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से लड़ाई नहीं रुकेगी #StudentProtest #Congress #Trending #NEETScam...
Instagram पर Part Time Job के नाम पर ₹6.84 लाख की ठगी...
₹150 के लालच में चाकू से हमला! #NagpurCrime #Crime #ERickshaw #PoliceAction #CCTV...
पार्किंग विवाद ने लिया हिंसक रूप! #NagpurNews #Crime #ParkingDispute #VikasThakre #PoliceAction
रॉन्ग साइड से आई मौत! #Accident #HighwayAccident #NagpurNews #MaharashtraNews #TruckAccident #news
RSS मुख्यालय को लेकर X पर भ्रामक पोस्ट करने का आरोप #vidarbhanews...





