| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Dec 21st, 2020

  मेट्रो ट्रॅक वर गाडीत बिघाड होतो तेव्हा…

  न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन जवळ मेट्रोचे मॉक ड्रिल,महा मेट्रोद्वारे आता पर्यंत ३०० पेक्षा जास्ती मॉक ड्रीलचे आयोजन

  नागपूर – सायंकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास महा मेट्रोच्या एयरपोर्ट साउथ मेट्रो स्टेशन येथून खापरी मेट्रो स्टेशनच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन मध्ये अचानक तांत्रिक बिघाड आढळून आले एयरपोर्ट साउथ मेट्रो स्टेशन ते न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशनच्या दरम्यान मेट्रो ट्रेन थांबल्या नंतर अचानक खळबळ उडाली व सर्व प्रवाशी नेमके काय झाले असेल आप-आपसात बोलू लागले तेवढ्यात ट्रेन ऑपरेटर ने कॅबिन येथून माईक द्वारे प्रवाश्याना सूचित केले कि, ट्रेन मध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे ट्रेन पुढे जाऊ शकत नाही व थोड्याच वेळात ट्रेनला दुसऱ्या ट्रेनच्या साह्याने ओढून नजीकच्या मेट्रो स्टेशन म्हणजेच न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन पर्यंत नेण्यात येईल व तेथून पुढील प्रवासाकरीता दुसरी ट्रेन मेट्रो प्रवाश्याना उपलब्ध होऊ शकेल. पण हे मॉक ड्रिल’ असल्याचे कळल्यावर प्रवाश्यानी मोकळा श्वास घेतला.

  तांत्रीक बिघाडामुळे थांबलेल्या मेट्रो ट्रेनला ओढून नेण्याकरिता खापरी मेट्रो स्टेशन येथून दुसरी मेट्रो ट्रेन ७ मि. मध्ये घटनास्थळी पोहोचली व ट्रेनला एकमेकांक्षी जोडन्यात आले ज्याकरिता १० मि. लागले व ट्रेनला ओढून नजीकच्या मेट्रो स्टेशन पर्यंत आणण्यात आले ज्या करिता ५ मि. लागले. यावेळी ४५ प्रवासी ट्रेनच्या आता होते व त्यांनी न्यू एयरपोर्ट मेट्रो स्टेशन येथे उतरून दुसरी ट्रेन ने पुढील प्रवास केला व तांत्रिक बिघाड असलेल्या ट्रेनला दुरुस्ती करिता मिहान डेपो येथे पाठविण्यात आले.

  सदर मॉक ड्रिलचे मुख्य उद्देश अश्या प्रकारची स्थिती उदभवलयास कश्या प्रकारे यंत्रणा कार्यानव्यित करण्यात येईल या करता या मॉक ड्रिलचे प्रात्यक्षिक मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीत करण्यात आले व यशस्वीपणे सदर मॉक ड्रिल पूर्ण करण्यात आले.

  नागपूर मेट्रो रेल प्रकल्पांतर्गत मेट्रो कामगारांन सोबत प्रवाश्यांनच्या सुरक्षतेला देखील प्राथमिकता देण्यात येते याच अनुषगाने महा मेट्रो द्वारे आता पर्यत ३०० हून जास्ती मौकड्रीलचे आयोजन करण्यात आले आहे. मेट्रो स्थानकांची सुरक्षा आणि सतर्कतेचे परीक्षण व प्रशिक्षण देण्याकरिता मौकड्रीलचे आयोजन महा मेट्रोच्या वतीने वेळोवेळी करण्यात येते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145