| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jan 13th, 2021

  उपद्रव शोध पथकाद्वारे महापौर व उपमहापौरांचे स्वागत

  नागपूर: नागपूर शहरामध्ये उपद्रव पसरवून शहराची प्रतिमा मलीन करणा-यांवर कारवाई करण्यासाठी नियुक्त मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी व उपमहापौर मनीषा धावडे यांचे स्वागत करण्यात आले.

  महापौर व उपमहापौरांच्या कक्षामध्ये उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात सर्व झोनच्या पथक प्रमुखांनी पुष्पगुच्छ देउन त्यांचे स्वागत केले. यावेळी राम कोरडे, पुंडलिक सावंत, उपद्रव शोध पथकाचे लक्ष्मीनगर झोन पथकप्रमुख संजय खंडारे, धरमपेठ झोन पथकप्रमुख धर्मराव कटरे, हनुमाननगर झोन पथकप्रमुख पवन डोंगरे, धंतोली झोन पथकप्रमुख नरहरी गिरकड, नेहरूनगर झोन पथकप्रमुख नत्थु खांडेकर, गांधीबाग झोन पथकप्रमुख सुशील तुप्ते, सतरंजीपुरा झोन पथकप्रमुख प्रेमदास तरवटकर, लकडगंज झोन पथकप्रमुख सुधीर सुडके, आसीनगर झोन पथकप्रमुख संजय सोनोने, मंगळवारी झोन पथकप्रमुख नरेंद्र तुरकर आदी उपस्थित होते.

  महापौरांनी शहरात सुरू असलेल्या कारवाईचा आढावा घेतला. नायलॉन मांजा संदर्भात शहरात घडत असलेल्या दुर्घटना दुर्दैवी आहेत. त्यामुळे नायलॉन मांजा संदर्भात कारवाईला गती देउन नागरिकांना तसेच तरुणांना नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145