जवाहरलाल नेहरू विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत
सावनेर- कोविड-१९ मुळे गेल्या १० महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा शासनच्या निर्णयानुसार वर्ग पांचवी ते आठवीं पर्यंत दि- २७ जानेवारीपासून सुरू करण्यात आले, याप्रसंगी जवाहरलाल नेहरू विद्यालयात वर्ग पाचवी ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहाने करण्यात आले.
यावेळी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर भव्य रांगोळी काढण्यात आलेली होती, त्याचप्रमाणे विद्यार्थी मार्गक्रमण गुलाब पाकळ्यांनी सजविण्यात आले ,वर्ग प्रवेशद्वारावर रंग-बिरंगी फुग्यांची सजावट पाहायला मिळाली.
शाळेच्या प्रवेश द्वारापासून वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना बॅण्डपथक द्वारे आणि फुलांचा वर्षाव करून पोहोचविण्यात येत होते .यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतार्थ शिक्षकांनी मधूर स्वागतगीत ही सादर करून मंगलमय वातावरण निर्मिती केली.
विद्यालयाचे पालक संचालक ॲड. चंद्रशेखर बरेठीया, पत्रकार बाबा तिकडे, मुख्याध्यापक कृष्णकांत पांडव , परिवेक्षक विजय साबळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.यावेळी विद्यार्थ्याना विद्यालयात वारंवार कोविड-१९ विषयावर मार्गदर्शक सूचना सांगून त्यांचे पालन करण्यास सांगण्यात आले. इतके दिवसानंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी व शिक्षक यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होते.
– दिनेश दमाहे (9370868686)