Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
    | | Contact: 8407908145 |
    Published On : Wed, Jan 27th, 2021

    सर्वाना मिळून नागपूरकरांच्या अपेक्षा व आकांक्षा वर खरे उतरायचे आहे : दीक्षित

    – या वर्षा अखेर सीए रोड व कामठी मार्गावर मेट्रो सेवा

    नागपुर – मेट्रो भवन येथे प्रजासत्ताक दिना निमित्य झेंडावंदनाचा कार्य्रक्रम महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते संपन्न झाला ! उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना व्यवस्थापकीय संचालक ने सांगितले कि सर्वाना मिळून नागपूरकरांच्या अपेक्षा व आकांक्षा वर खरे उतरायचे आहे. जेव्हा २०- ते २२ हजार नागरिक नियमित पणे मेट्रो ने प्रवास करतात हे बघून अत्यंत गर्व आणि संतुष्टीची बाब आहे. या पुढे देखील अश्याच प्रकारे कार्य करायचे आहे.

    मेट्रोचे सर्व कर्मचारी वेगवेगळ्या भागातून असून सुद्धा टीम वर्क ने कार्य करित आहे हे चांगले उदाहरण महा मेट्रोने सादर केले आहे. आता पूर्ण पणे कार्य पूर्ण झाले नसून आणखी चांगले कार्य करायचे आहे जो चांगले कार्य करतो त्याला आणखी कार्य प्राप्त होते.

    सिडकोचा ठाणे मेट्रो रेल प्रकल्प, वारांगल शहराचा मेट्रो डीपीआर, नाशिकचा मेट्रो नियो प्रकल्प हे एक उत्तम उदाहरण आहे.

    रायडरशिप आणखी वाढायला पाहिजे, सुरुवात चांगली झाली आहे. या वर्षा अखेर रिच – २ (सिताबर्डी ते आटोमोटिव्ह ) व रिच – ४ (सिताबर्डी ते प्रजापती नगर) पूर्ण होऊन मेट्रो सेवा सुरु होणार त्यानंतर आणखी रायडरशिप वाढेल असे विचार डॉ. दीक्षित यांनी व्यक्त केले.

    पुणे मेट्रो रेल प्रकल्पाचे ५०% कार्य पूर्ण झाले असून या वर्षी २ सेक्शन पुणेकरांन करता खुले होणार. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाचा फेज – २ आणि नाशिकचा नियो मेट्रो रेल प्रकल्प अंतिम मंजुरी करता अग्रेसर आहे. नागपूर आणि पुणे मेट्रो रेल प्रकल्प सुखरूप परिवहनाचे साधन देण्याकरिता कटिबद्ध आहे असे विचार डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केले.


    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145