विधीमंडळ विशेषाधिकार समितीवर विकास ठाकरे
नागपुर – विधीमंडळ कामकाजात महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या विशेषाधिकार समितीमध्ये पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. मागासवर्ग कल्याण समितीमध्ये सुध्दा त्यांची सदस्य म्हणून निवड करून त्यांना दुहेरी संधी दिली गेली आहे.
विशेषाधिकार समितीमध्ये हक्कभंगाच्या संदर्भातील तक्रारीवर निर्णय घेतले जातात. सध्या कंगणा राणावत यांच्यावरील हक्कभंगाचा विषय समितीपुढे आहे.
सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर समितीचे सदस्य आहेत. मागासवर्ग कल्याण समिती ही विधीमंडळाची महत्त्वाची समिती आहे. मंगेश कुडाळकर समितीचे अध्यक्ष असून ठाकरे सदस्य आहेत. विधीमंडळात प्रथमच पदार्पण केलेल्या ठाकरेंचा दोन महत्त्वाच्या समितीमध्ये समावेश केल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.