नमो नमो मोर्चा भारत च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विजय हटवार
रामटेक: नमो नमो मोर्चा भारत ही राष्ट्र प्रथम विचारधाराने प्रेरित देशातील सर्वात मोठी राष्ट्रीय सामाजिक संघटना असून जी की, प्रधानमंत्री जनकल्याण योजना प्रचार प्रसार करणे, समाजोपयोगी कामे, मदत कार्य व राष्ट्रहिताचे कार्य अखंड करीत आहे.
आज पर्यंत १५ लाख सदस्य संख्या असलेल्या ह्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून विजय हटवार यांची नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्तीची घोषणा संघटनेचे राष्ट्रीय मुख्य संरक्षक आदरणीय सोमाभाई मोदी यांच्या आशिर्वदाने व मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी , भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व , उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आशीर्वादाने .
नमो नमो मोर्चा भारता च्या राष्ट्रीय कोर कमिटी मार्फत करण्यात आली.
विजय हटवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते विदर्भ महामंत्री भाजपा प्रशिक्षण आघाडी, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजपा ओबीसी मोर्चा व सदस्य भारतीय खाद्य निगम भारत सरकार नवी दिल्ली सामाजिक व राजकीय प्रवास केलेले एक उतुंग व्यक्तिमत्त्व, प्रदीर्घ अनुभव व अनेक सामाजिक व स्वयंसेवी संघटनेची नाळ असलेले व शिक्षण क्षेत्रात पण कार्य करणारे, एक राष्ट्रीय नेते व तळागाळातील कार्यकर्त्यापासून ते मोठ्या मोठ्या उद्योग, व्यवसायिक व विविध पक्षातील राजकीय व्यक्तींशी मैत्रीचे नाते जपणारे एक बहुआयामी, हसतमुख व हुशार अनुभवी व्यक्तिमत्त्व नमो नमो मोर्चा भारताच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी विराजमान झाल्याने नागपूर, महाराष्ट्र सह संपूर्ण भारतातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संघटन कौशल्य, अनुभव , जनसंपर्क व वरिष्ठ पातळीवर जपलेले हितसंबंध या जोरावर निश्चितच ते नमो नमो मोर्च्याच्या लाखो सदस्य व पदाधिकारी यांना न्याय देतील अशी आशा आहे.
त्यांच्या निवडीचे भाजपा राष्ट्रीय कोषाध्यक्ष खासदार. सुधीर गुप्ता , खासदार रामदास तडस साहेब , खासदार. विकास महात्मे साहेब सह सत्यप्रकाश सिंह- राष्ट्रीय संयोजक, सोपान उंडे पाटील- राष्ट्रीय मुख्य समनव्यक इत्यादी नि अभिनंदन केले आहे.