| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Dec 21st, 2020

  नागपूर मेट्रो प्रवाश्याकरिता उपयुक्त व सोईस्कर : वनवे

  – स्वतःच्या वाहनांचा उपयोग न करता नागपूर मेट्रोने प्रवास करावा, वनवे यांचे नागपूरकरांना आवाहन

  नागपूर– ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. महा मेट्रो च्या प्रवासी सेवेला नागरिकांतर्फे उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असतानाच,दुसरीकडे शहरातील लोक प्रतिनिधी देखील मेट्रो सेवेचा अनुभव घेत आहे. याच शृंखलेत, नागपूर महानगर पालिकेत विरोधी पक्ष नेता श्री तानाजी वनवे यांनी आज मेट्रो राईड केली. श्री. तानाजी वनवे यांनी महा मेट्रोच्या ऑरेंज लाईन मार्गिकेवरील सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास केला.

  नागपूर मेट्रो रेल प्रकल्प अतिशय चांगल्या रित्या शहरामध्ये सुरु असून आज खापरी मेट्रो स्टेशन पर्यंत प्रवास करतांना चांगला अनुभव आला. मेट्रोतून प्रवास करतांना शहराचे विहंगम दृश्य बघायला मिळते. नागपूर मेट्रोचा प्रवास प्रवाश्याकरिता अतिशय उपयुक्त व सोईस्कर असून नागरिकांनी स्वतःच्या वाहनांचा उपयोग न करता नागपूर मेट्रोने प्रवास करावा असे आवाहन श्री. वनवे यांनी केले. मेट्रो प्रवासाची संपूर्ण रचना अतिशय सुटसुटीत असून अतिशय सहजपणे आपण मेट्रोने प्रवास करू शकते, असेही ते म्हणाले.

  नागपूर शहरामध्ये नागपूर मेट्रोच्या रूपात अतिशय चांगली वाहतूक प्रणाली तयार करण्यात आली आहे, आंतराराष्ट्रीय दर्ज्याची पायाभूत सुविधा आज नागपूर शहरामध्ये उपलब्ध आहे हे आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे शहराच्या कुठल्याही भागातून मेट्रो स्टेशन पर्यंत नागरिकांना पोहोचता येते. या शिवाय नागपूर महानगर पालिकेच्या रूपात फिडर बस सुरु झाल्याने बुटीबोरी पर्यतचा प्रवास देखील सोपा व स्वस्त झाला आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून पैसे वाचविण्यास मदत होत असून पर्यावरण राखण्यास देखील मदत होते, असे आवाहन विरोधी पक्ष नेता श्री. तानाजी वनवे यांनी नागरिकांना केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145