| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jan 11th, 2021

  कृपया बूस्टर (टुल्लू) पंप वापरू नका, आपल्या शेजारच्या लोकांना पण पिण्याचे पाणी मिळू द्या…

  टुल्लू पंपाचा बेकायदेशीर वापरामुळे एक दिवसाआड (alternate day) पाणीपुरवठा दरम्यान कमी दाब किवा पाणी नसल्याच्या तक्रारी…

  नागपूर, ११ जाने २०२१ : ६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी , २०२१ या कालावधीत गोरेवाडा स्थितः (पेंच १, पेंच २, पेंच ३) णि गोधनी (पेंच ४) जलशुद्धीकरण केंद्र वर आधारित असलेले लक्ष्मिनगर झोन, धरमपेठ झोन, हनुमान नगर झोन, धंतोली झोन, मंगळवारी झोन, आसी नगर झोन, तसेच सतरंजीपुरा झोन ह्या भागात आधीच एक दिवसाआड (alternate day) पाणीपुरवठा होत आहे. पण ह्या दरम्यान बरेचदा असे आढळून आले आहे कि काही नागरिक बेकायदेशीररीत्या बूस्टर (टुल्लु) पंप वापरून स्वतः करिता जास्तीचे पाणी ओढून घेत आहेत आणि इतर शेजारी राहणार्यांना पिण्याचे पाणी मिळण्यापासून दुरावत आहेत.

  बेकायदेशीररीत्या बूस्टर (टुल्लु) पंप वापरून स्वतः करिता जास्तीचे पाणी घेऊन काही नागरिक इतरांसाठीचे (खास करून शेजारी राहणाऱ्या आपल्या मित्राचे, नातेवाईक) पाणी हिसकावून घेत असतात. बरेच ठिकाणी ज्या भागात एक दिवसाआड (alternate day) पाणीपुरवठा होत आहे त्या दिवशी अत्यंत कमी दबावाने किवा कमी पाणी येत असल्याच्या तक्रारी येत आहे.

  येथे उल्लेखनीय आहे कि, नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर यांनी बूस्टर पंपाचा सर्रास वापर होणारे भाग ओळखून ठेवलेले आहेत. जसे कि धंतोली झोन अंतर्गत सावित्रीबाई फुले नगर बजरंग नगर आंबेडकर मार्ग, आशी नगर झोन (दिक्षित नगर यशोधरा नगर), धरमपेठ झोन (फुटाला वस्ती, संजय नगर वस्ती, हजारी पहाड, सुरेंद्र गाढ) , सतरंजी पुरा झोन (मोमिनपुरा , मोहम्मद आली सराय , कुंभार पुरा , बरसे नगर , शोभा खेत , लष्कारीपुरा घासी पुरा) हनुमान नगर झोन: (राहटे नगर टोळी), नेहरू नगर झोन ( ताज बाग , सरताज कॉलोनी, औलिया नगर हसंबाघ, नंदनवन झोपडपट्टी, निराला कॉलोनी) धंतोली झोन (वाकील्पेठ, सिरसपेठ, भालदारपुरा आणि बाजेरिया) , महाल झोन ह्या भागात बेकायदेशीररीत्या बूस्टर (टुल्लु) पंप मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत.

  सक्करदरा निवासी एक नागरिक त्यांच्या तक्रारीत म्हणतात, “एक दिवसाआड (alternate day) पाणीपुरवठा च्या या दिवसात आमच्या मागच्या गल्लीत ३-४ तास नळ असतो. मात्र माझ्या आणि आजूबाजूच्या ४-५ घरांना पाणी मिळू शकत नाहीये. मागच्या काही दिवसापासून १ थेंबही पाणी मिळत नाहीये. आमच्या घराजवळ नळाला टिल्लू पंप लावला जातो अशी शंका मला आहे. कृपया यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा. पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला वणवण करावी लागत आहे. “ अशाच प्रकारच्या ताकारारी बरेच झोन मधून येत आहेत.

  बेकायदेशीररीत्या बूस्टर (टुल्लु) पंप वापरून स्वतः करिता जास्तीचे पाणी घेणे हे केवळ बेकायदेशीरच नसून अनैतिकदेखील आहे. बूस्टर पंपाचा वापर मनपाच्या पाणी उपविधीनुसार दंडनीय अपराध आहे व असा वापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येऊ शकते. मनपा पाणीपट्टी दर उपविधीनुसार बूस्टर पंप अथवा तत्सम उपकरण वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते.

  येथे उल्लेखनीय आहे कि, मनपाच्या पाणीपट्टी उपविधीनुसार ‘मुख्य जलवाहिनीला बुस्टरपंप अथवा तत्सम उपकरण लावून पाणी घेतल्यास कार्यकारी अभियंता किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी अशा उपकरणाचा वापर करणाऱ्याचा पाणीपुरवठा खंडित करू शकतात तसेच हे उपकरण जप्त करू शकतात आणि त्या ग्राहकावर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येऊ शकते. ग्राहकाने पूर्ववतीकरणाचा खर्च दिल्याचा अपवाद वगळता जप्त केलेला पंप कुठल्याही परिस्थितीत परत केला जाणार नाही.”

  OCW­-मनपाने नागरिकांना बूस्टर पंप न वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी जागरूक नागरिकांना असेही आवाहन केले आहे कि, कुठेही बूस्टर पंप वापर आढळून आल्यास OCWच्या २४x७ नि:शुल्क मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर तक्रार करू शकतात अथवा झोन मॅनेजर/मनपा डेलिगेटला मनपा-OCW झोन कार्यालयात संपर्क करू शकतात.

  एक दिवसाआड (alternate day) पाणीपुरवठा होणारे जलकुंभ :

  दिनांक १२,१४,१६,१८,२०,२२,२४,२६,२८,३० , फेब्रू १, ३ , ५ ला होणारा पाणी पुरवठा

  १) लक्ष्मिनगर झोन: खामला जलकुंभ, प्रताप नगर जलकुंभ, गायत्री नगर जलकुंभ, लक्ष्मिनगर (जुना) जलकुंभ , त्रिमूर्ती नगर जलकुंभ , टाकली सीम जलकुंभ, जयताला जलकुंभ,

  २) धरमपेठ झोन: दाभा जलकुंभ आणि टेकडी वाडी जलकुंभ, सेमिनरी हिल्स (GSR & ESR) जलकुंभ, राम नगर (GSR & ESR

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145