Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jan 22nd, 2021

  वृक्षलागवडीमुळे भांडेवाडी डम्पींग यार्ड परिसरातील हवा शुद्ध होण्यास मदत मिळेल – दिव्‍या धुरडे

  मियावाकी पध्दतीच्या वृक्षलागवडीची जैविक विविधता समितीद्वारे पाहणी

  नागपूर : जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिव्‍या दिपक धुरडे यांनी शुक्रवारी (ता. 22) भांडेवाडी डम्पींग यार्ड येथील मियावाकी पध्दतीने केलेल्या वृक्षलागवडीची पाहणी करून चर्चा केली. यावेळी दिव्‍या धुरडे यांनी मनपाच्या उद्यान विभागाची प्रशंसा केली. पर्यावरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा असून या प्रकल्पामुळे येणा-या काळात भांडेवाडी परिसरातील हवा शुध्द होण्यास मदत होईल. उद्यान विभागाने कोरोना काळात केलेले वृक्षलागवडीचे काम महत्वपूर्ण आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भांडेवाडी डम्पींग यार्ड येथे ओसाड पडलेल्या जमिनीवर पुढील एक वर्षात घनदाट जंगल तयार होउन परिसरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. तसेच परिसरात ऑक्सिजनचे प्रमाण देखिल वाढेल असा विश्वास दिव्‍या धुरडे यांनी व्यक्त केला.

  महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या पुढाकारातून भांडेवाडी येथील डम्पींग यार्ड, जुना कत्तलखाना सिम्बॉयसिस कॉलेजच्या सुरक्षा भिंतीलगत मियाविकी पध्दतीने सुमारे १५ हजार ५०० झाडांची लागवड केली आहे. जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा दिव्‍या दिपक धुरडे यांनी शुक्रवारी डम्पींग यार्ड येथील वृक्षलागवडीची पाहणी केली. तसेच या ठिकाणी दिव्‍या धुरडे आणि उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

  यावेळी समिती सदस्या आशा उईके, उपायुक्त (उद्यान) अमोल चौरपागर, जैविक विविधता समिती सदस्य दिलीप चिंचमलातपूरे, विजय घुगे, अनुसया काळे, प्राची माहुरकर, कॉलेज ऑफ फिशरी सायंस चे सहायक प्राध्यापक डॉ. जे. जी. के. पठाण, पशुसंवंर्धन विभागाचे आकाश बन्सोड, उद्यान निरिक्षक अनंत नागमोते, कंत्राटदार भुषण सारवे, प्रद्युम्न सहस्त्रभोजने आदी उपस्थित होते.

  नागपूर शहरात मियावाकी पध्दतीने वृक्षलागवडीचा हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पाची सुरूवात जानेवारी २०२० ला करण्यात आली. प्रकल्पाच्या माध्यमातून भांडेवाडी डम्पींग यार्ड मध्ये ओसाड पडलेली जमीन हिरवीगार झाली. यामध्ये आतापर्यंत ४० प्रकारची सुमारे १५ हजार ५०० झाडांची लागवड करण्यात आली आहे. ही लागवड ५०० मिटर लांब आणि १० मिटर रूंद एवढ्या जागेवर करण्यात आली अहे. तसेच झाडांना पाणी देण्यासाठी या ठिकाणी एक मोठी विहीर आणि दोन बोअरवेलची व्यवस्था करण्यात आली आहे. केवळ आठ महिन्यात ओसाड पडलेली जमीन आज हिरवीगार झाली असून येथे विविध प्रकारच्या पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळतो. सोबतच येथे विविध प्रकारची फुलपाखरे सुध्दा येण्यास सुरूवात झाली आहे, अशी माहिती उपायुक्त (उद्यान) अमोल चौरपागर यांनी यावेळी दिली.

  काय आहे मियावाकी पध्दत?
  मियावाकी पध्दतीचा उद्देश ओसाड/रिकाम्या भूभागावर जलद गतीने जैव विविधता राखून वृक्ष संपदा रुजवणे व तिचे संवर्धन करणे हा आहे.

  जमिनीचा पट्टा निश्चित केल्यानंतर तो ३ फुट खोल खणून निघालेल्या मातीत सेंद्रिय खत मिसळले जाते. त्यानंतर ही खत मिश्रित माती पुन:श्च खड्यात भरून जामिनीचा पट्टा पूर्ववत करतात. काही दिवस पाणी फवारुन जमीन लागवडी योग्य करून रोपांची लागवड केली जाते. लागवड करताना झाडांच्या जातींची सरमिसळ हेतू पूर्वक केली जाते. वृक्षाच्या जाती, जमिनीची पत व त्याभागात असलेल्या भूजल पातळी वरून किती काळ पाणी देणे आवश्यक आहे हे ठरविले जाते. वनाची वाढ जलद गतीने होते हे निश्चित.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145