| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jan 29th, 2021

  बनावट रेल्वे तिकीटावर प्रवास

  – राजधानी एक्स्प्रेसमधील धक्कादायक, लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा

  नागपूर– रेल्वे तिकीट तपासणीसाच्या कर्तव्यदक्षतेमुळे बनावट रेल्वे तिकीटावर प्रवास करणाèया एका अभियंत्याला पकडले. आरपीएफच्या तक्रारीवरून त्याच्या विरूध्द लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. वशिष्ठ महर्षी (२६) असे प्रवास करणाèयाचे नाव आहे.

  वशिष्ठला १२६९२ दिल्ली – बेंगळुरू राजधानी एक्स्प्रेसने भोपाळ ते सिकंदराबाद असा प्रवास करायचा होता. भोपाळ रेल्वे स्थानकावर गाडी आली असता तो बी-१० बोगीत चढला. या गाडीत तिकीट तपासणीस म्हणून नवीनकुमार कुमावत हे कर्तव्यावर होेते. भोपाळ वरून गाडी सुटल्यानंतर काही वेळातच कुमावत यांनी प्रवाशांचे तिकीट तपासायला सुरूवात केली. तिकीट तपासत असताना ते वशिष्ठ जवळ आले. त्याला तिकीट विचारले. त्याने मोबाईलवरील तिकीट दाखविले. या तिकीटेवर कोच बी-१० आणि बर्थ २० असे नमुद होते. विशेष म्हणजे या बोगीतील २० नंबरची बर्थही रिकामी होती.

  कुमावत यांनी रेल्वेचा चार्ट तपासला. त्यात मात्र, असा कुठलाही पीएनआर नव्हता. त्यांनी पीन्हा चार्टची तपासले. परंतु कुठेही ते नाव, पीएनआर आणि बर्थ नंबर नव्हते. त्यामुळे टीसीला शंका आली. त्यांनी लगेच वरिष्ठांना माहिती दिली. गाडी नागपुरात आली असता त्याला उतरविले. आरपीएफ ठाण्यात घेवून गेले. आरपीएफने त्याची सखोल चौकशी केल्यानंतर लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द केले. आरपीएफच्या तक्रारीनंतर त्याच्या विरूध्द भादंवि ४६८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यात बनावट तिकीट तयार करून रेल्वेची फसवणूक केल्याचा नमूद आहे.

  अशी बनविली तिकीट
  वशिष्ठ हा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याने एका मोबाईवर रेल्वे तिकीट बनविली आणि ते दुसèया मोबाईलवर लोड केली. लोड केलेला मोबाईल घेवूनच तो प्रवास करीत होता. कोणी शंकाच घेणार नाही अशी ई तिकीट हुबेहुब दिसत होती. मात्र, रेल्वे तिकीट तपासणीसाच्या कर्तव्यदक्षतेमुळे तो पोलिसात अडकला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक विजय तायवाडे करीत आहेत. तायवाडे यांनी गुरूवारी तिकीट तपासनीस नवीन कुमार कुमावत आणि प्रमोद कुमार शॉ याचे बयान नोंदविले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145