एयरपोर्ट ते लोकमान्य नगर पर्यंतचा प्रवास खूप जास्ती स्वस्त : मेट्रो प्रवासी
– प्रसन्न व प्रफुलित वातावरणात करा मेट्रोने प्रवास : पोलीस उपनिरीक्षक आव्हाड,मेट्रोचा उपयोग करून पैसे व वेळेची बचत : सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर
नागपूर : नागपूर शहराचा चेहरा पूर्ण पणे बदलला आहे, ५ वर्षा नंतर आज पहिल्यांदा शहरात आलो आणि शहराचे नवीन रूप बघून थव्क झालो अशी प्रतिक्रिया मेट्रो प्रवासी श्री.अभिषेक कुमार यांनी व्यक्त केली. श्री. बंगळुरू येथून ५ वर्षा नंतर आज पहिल्यांदा शहरामध्ये आले होते त्यांना त्यांच्या इंजिनीअरींग कॉलेज येथून डिग्री घ्यायची होती त्याकरता ते नागपूर शहरात आले होते. नागपूर एयरपोर्ट येथे उतरताच त्यांनी एयरपोर्ट येथील परिसरात लोकमान्य नगर पर्यंत प्रवासाच्या इतर साधना बदल माहिती घेतली असता ते अतिशय महागडे असल्याचे लक्षात आले परंतु माझ्या सोबत असलेल्या प्रवाश्यानी सांगितले कि मेट्रो ट्रेनचा उपयोग करून तुमचा प्रवास आरामदायक व स्वस्त होऊ शकतो.
श्री.कुमार यांनी एयरपोर्ट येथून एयरपोर्ट मेट्रो स्टेशन पर्यंत निःशुल्क सुरु असलेल्या फिडर सेवेचा मेट्रो स्टेशन पर्यंत प्रवास केला व एयरपोर्ट मेट्रो स्टेशन ते सिताबर्डी व सिताबर्डी येथून लोकमान्य नगर पर्यंतचा प्रवास फक्त २० रुपये मध्ये प्रवास पूर्ण केला याने वेळ व पैसेची बचत झाली. आज एवढ्या वर्षा नतर शहरात येउन खुप आनंद झाला व मेट्रो स्टेशन येथील उपलब्ध सोई सुविधा अत्यंत फायदेमंद असून या बदल मेट्रो प्रशासनाचे आभार मानले तसेच माझ्या करता हा चांगला अनुभव असल्याचे सांगितले व महा मेट्रोच्या चांगल्या नियोजना बद्दल शुभेच्छा दिल्या. ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे.
प्रसन्न व प्रफुलित वातावरणात करा मेट्रोने प्रवास : पोलीस उपनिरीक्षक (ट्रॅफिक) श्री. सारंग आव्हाड
प्रसन्न व प्रफुलित वातावरणात मेट्रोचा उपयोग करून श्रम व पैसेची बचत करावी व जास्तीत जास्ती मेट्रो सेवांचा वापर करावा असे मत पुलिस उपनिरीक्षक (ट्रॅफिक) श्री. सारंग आव्हाड यांनी व्यक्त केले. श्री. आव्हाड यांनी सिताबर्डी ते लोकमान्य नगर दरम्यान मेट्रो ने प्रवास केला. मेट्रोतून प्रवास करतांना अंबाझरी तलावाचा परिसर सुंदर दिसतो. मेट्रो ही पर्यावरणपूरक कम्युनिकेशन सिस्टीम आहे कुठल्याही त्रासा विना सुरक्षित प्रवास करू शकतात. दु -चाकीच्या तुलनेत मेट्रो अतिशय स्वस्त आहे. रस्त्यावरून चालणाऱ्या वाहन चालकांनी वाहन चालवितांना ट्रॅफिक नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा तसेच शक्य असेल तेवढे सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करावा असे आवाहन श्री. आव्हाड यांनी नागरिकांना केले.
मेट्रोचा उपयोग करून पैसे व वेळेची बचत : सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर
मेट्रोचा अनुभव व प्रवास अतिशय चांगला असून फक्त ३० रु. मध्ये एयरपोर्ट ते घरापर्यंत मेट्रोचा प्रवास पूर्ण केला जर तुम्हाला कळले कि कुठून किती वाजतांनी मेट्रो उपलब्ध आहे तर तुमच्या करता मेट्रो अतिशय फायदेमंद आहे एयरपोर्ट येथून तुम्हाला वेळोवेळी मेट्रो संदर्भात सूचना केल्या जातात ज्याने तुम्हाला योग्य ती माहिती प्रदान होते असे मत विष्णू मनोहर यांनी व्यक्त केले.
मेट्रोचा प्रवास अतिशय आरामदायक : प्रशिक्षीत डॉक्टर
आम्ही मेट्रो सेवेचा सिताबर्डी इंटरचेंज येथून लोकमान्य नगर स्टेशन पर्यंत दररोज वापर करीत असून आमच्या करता हा प्रवास अतिशय आरामदायक आहे. कुठल्याही त्रासाविना आम्ही सहजपणे घर ते कॉलेज व कॉलेज ते घर जाऊ शकतो. मेट्रोच्या रूपात आमच्या सारख्या विद्यार्थ्यानं अतिशय फायदेमंद वाहतुकीचे साधन उपलब्ध झाले आहेत ही प्रतिक्रिया लता मंगेशकर कॉलेज येथे प्रशिक्षीत डॉक्टर विद्यार्थ्याने व्यक्त केली.