Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
    | | Contact: 8407908145 |
    Published On : Wed, Jan 20th, 2021

    पाणी कर १०० टक्के शास्ती माफीचा गुरुवारी अखेरचा दिवस

    मालमत्ता कर शास्तीमध्ये आता ५० टक्के सवलत

    नागपूर : थकीत पाणी कर भरण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने जाहीर केलेल्या अभय योजनेच्या पहिल्या टप्प्याची मुदत गुरुवारी (ता. २१) संपत असून नागरिकांनी शास्तीत १०० टक्के सवलतीसाठी थकीत पाणी कराची रक्कम एकमुस्त भरावी, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

    मनपाने अभय योजना जाहीर केल्यानंतर नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. थकीत पाणीकरावरील शास्तीत १०० टक्के सूट देण्याची घोषणा करीत मनपा प्रशासनाने पाणी कर अभय योजना जाहीर केली. पहिल्या टप्प्यात २१ डिसेंबर २०२० ते २१ जानेवारी २०२१ दरम्यान थकीत पाणीकर एकमुस्त भरल्यास शास्तीत १०० टक्के तर २२ जानेवारी ते २२ फेब्रुवारी या कालावधीत रक्कम भरल्यास शास्तीत ७० टक्के सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार १०० टक्के सवलतीचा उद्या अर्थात २१ जानेवारी आज अखेरचा दिवस आहे. अखेरच्या दिवशी नागरिकांनी आपला थकीत पाणी कर एकमुस्त भरून १०० टक्के सवलत प्राप्त करावी, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

    मालमत्ता करात आता ५० टक्के सवलत
    थकीत मालमत्ता कर नागरिकांनी भरून आपली पाटी कोरी करावी यासाठी मालमत्ता कर अभय योजनासुद्धा १५ डिसेंबर २०२० पासून जाहीर करण्यात आली. मालमत्ता कर करीता थकित रक्कमेवरील शास्ती / दंड रक्कम ८० टक्के माफ करण्याचे पहिले चरण दि. २० जानेवारी, २०२१ रोजी संपुष्टात आले. सदर कालावधीत जवळपास ३५ हजार कर दात्यांनी योजनेचा लाभ घेऊन रु. ९.७६ कोटी शास्ती रक्कम माफ करुन घेतलेली आहे.

    मालमत्ता कर थकित रक्कमेवरील शास्ती रक्कम ५० टक्के माफ करणेचा दुसरे चरण दि. २१ जानेवारी २०२१ पासून सुरु करण्यात आलेले आहे. करदात्यांना आवाहन करण्यात येत आहे की, २१ जानेवारी २०२१ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कार्यालयीन वेळेत थकित मालमत्ता कर रक्कम नागपूर महानगरपालिका निधीत जमा करुन शास्ती / दंड रक्कम ५० टक्के माफ करुन घेण्याचा लाभ घ्यावा. दि. १५ फेब्रुवारी २०२१ नंतर आढळलेल्या मालमत्ता कर थकबाकीदारांचे स्थावर / जंगम मालमत्तेची जप्ती करुन थकित मालमत्ता कर वसूल करण्याची परिस्थीती उदभऊ देवू नये असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.


    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145