Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Dec 21st, 2020

  ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करा : ना. गडकरी

  हलबा समाजातील गुणवंतांचा सत्कार

  नागपूर: सध्या ज्ञानाचे युग आहे. हलबा समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च विद्या विभूषित होऊन ज्ञान संपादन करावे. या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा. तसेच आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगती करून चांगले व्यक्तिमत्त्व घडवावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

  कोलबा स्वामी फाऊंडेशनतर्फे आयोजित हलबा समाजातील दहावी व बारावीतील गुणवंतांचा सत्कार ना. गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. ना. गडकरी यांच्या निवासस्थानीच हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी कोलबा स्वामी फाऊंडेशनचे श्रीहरिबापू वेळेकर, चंद्रशेखर नगरधनकर उपस्थित होते.

  याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- दीर्घ कालावधीपासून दरवर्षी हा कार्यक्रम होतो. यंदा कोरोनामुळे छोटेखानी कार्यक्रम करावा लागत आहे. ज्ञान ही आज सर्वात मोठी शक्ती-ऊर्जा झाली आहे. नवीन संशोधन, तंत्रज्ञान, विज्ञान, कौशल्य, नाविण्य याचाच अर्थ ज्ञान आहे. आणि ज्ञानाचे संपत्तीत रुपांतर करणे ही आजची गरज आहे. यासाठी गडकरी यांनी महापालिकेचे सांडपाणी विकून 325 कोटी रुपये उत्पन्न मिळविल्याचे उदाहरण दिले.

  तसेच पुढील वर्षी पासून गुणवत्ता यादीत येणार्‍या सर्वाधिक गुण पटकाविणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही यावेळी ना. गडकरी यांनी केली. विद्यार्थ्यानी शिक्षणासोबतच सेवाही केली पाहिजे. चांगली वागणूक, चांगल्या सवयी अंगी असाव्या. ज्ञानासोबत मूल्य आणि संस्कार यांचीही जपणूक करून स्वत:चे एक चांगले व्यक्तिमत्त्व घडेल यादृष्टीने प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

  श्रीहरिबापू वेळेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी ना. गडकरी यांच्या हस्ते गुणवंतांना प्रशस्तीपत्रक आणि बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि त्यांचे पालक आवर्जून उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145