| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Dec 25th, 2020

  विमानतळावरील व्यवस्थेची मनपा आयुक्तांनी केली पाहणी

  अधिकाऱ्यांना दिल्या आवश्यक सूचना

  नागपूर : नागपूर विमानतळावर येणारे प्रवाशांपैकी ज्यांनी मागील ४ आठवडयात परदेश प्रवास केला आहे अश्या प्रवाशांची तपासणी करून त्यांना विलगीकरणात पाठविण्याचे शासनाचे आदेश असल्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गुरुवारी (ता. २४) विमानतळावर जाऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही केल्या.

  यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, पब्लिक हेल्थ इंस्टिट्यूचे डॉ. संजय चिलकर, मिहान विमानतळाचे संचालक आबीद रुही, टर्मिनल मॅनेजर अमित कासटवार उपस्थित होते.

  विमानाने परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करून त्यांना विलगीकरणात पाठविण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने विमानतळावर त्यांच्या तपासणीची व्यवस्था, सोशल डिस्टंसिंगचे पालन कशा प्रकारे करण्यात येते, त्यावर नियंत्रण कसे आहे, याबाबत त्यांनी आढावा घेतला. यासोबतच प्रशासनाने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी हॉटेलमध्ये विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांनी हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी व्हीएनआयटी येथे विलगीकरणाची व्यवस्था आहे. या दोन्ही व्यवस्थेचा मनपा आयुक्तांनी आढावा घेतला. विलगीकरणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावरून दोन बसेसची व्यवस्थाही प्रशासनातर्फे करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

  या व्यवस्थेच्या अनुषंगाने आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145