| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Dec 16th, 2020

  वीज केंद्रातील ‘त्या डिमोटेड’ मुख्य अभियंत्यांने उच्च न्यायालयातून घेतली माघार

  -२४ नोव्हेंबरला ठरविली होती नियुक्ती रद्द,मुख्य अभियंता पद भरती घोटाळ्याला नविन वळण,महानिर्मिती कंपनीच्या कोर्टात चेंडू*

  Gavel, Court

  Representational Pic

  खापरखेडा– स्थानिक औष्णिक वीज केंद्रात कार्यरत मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांची चुकीच्या पद्धतीने नियमबाह्य मुख्य अभियंता पदावर निवड केली नियमबाह्य निवड झाल्याचे निष्पन्न झाल्यावर महानिर्मिती कंपनीने २४ नोव्हेंबरला प्रकाश खंडारे याना मुख्य अभियंता डिमोटेड केले त्यामूळे खंडारे यांनी उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात आव्हाण दिले होते मात्र अचानक १५ डिसेंबर मंगळवारला उच्च न्यायालयात खंडारे यांनी शपथपत्र दाखल करून याचिका मागे घेतली त्यामूळे या प्रकरणाला नविन वळण प्राप्त झाले असून डिमोटेड करण्यात आलेल्या मुख्य अभियंत्याचा भविष्याचा चेंडू महानिर्मितीच्या कोर्टात दाखल झाला आहे.

  महानिर्मिती कंपनी अंतर्गत मुख्य अभियंता सरळसेवा भर्ती “२०१७” प्रक्रिया ३ मुख्य अभियंता पदाकरिता २२ में २०१७ रोजी राबविण्यात आली होती १ एससी, १ ओबीसी व १ खुल्या प्रवर्गासाठी मुख्य अभियंता पद आरक्षित करण्यात आले होते मात्र निवड समितीने पात्र उमेदवारांना डावलून खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांची नियमबाह्य १०% गुण वाढवून मुख्य अभियंता पदावर निवड केली प्रत्येक्षात प्रकाश खंडारे यांना लेखी परीक्षेत ४०.६०% तर प्रत्येक्ष मुलाखातीत १७% गुण मिळाले होते त्यांच्या गुणांची एकूण टक्केवारी ५७.६०% इतकी आहे मात्र खुल्या प्रवर्गातील उमेदवारांपेक्षा १०% ,गुण जास्तीचे वाढवून निवड समितीने प्रकाश खंडारे यांची नियमबाह्य मुख्य अभियंता पदावर निवड केली सदर मुख्य अभियंता पद भरती घोटाळा प्रथम प्रसार माध्यमाच्या माध्यमातून २९ आगस्ट रोजी उघडकीस आला शिवाय माहितीच्या अधिकारातून उघड झाला यासंदर्भात चौकाशी समिती स्थापन करण्यात आली चौकाशीत दोषी असल्याचे निष्पन्न झाले अखेर महानिर्मिती कंपनीने २४ नोव्हेंबर रोजी प्रकाश खंडारे यांना मुख्य अभियंता पदावरून डिमोटेड केले यासंदर्भातील आदेश २५ नोव्हेंबर ला रात्री उशिरा धडकले सदर आदेशा विरुद्ध प्रकाश खंडारे यांनी २७ नोव्हेंबरला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली सदर याचिकेत कार्यवाही करण्यापूर्वी कोणतीही चौकाशी व संधी दिली नसल्याचे स्पष्ट केले त्यामूळे स्थगिती देण्यात यावी असे नमूद केले सदर याचिकेवर सुनावणी करतांना न्या सुनील शुक्रे व न्या अविनाश घारोटे यांनी प्रकाश खंडारे यांची खारीज केली शिवाय महानिर्मिती कंपनीला उत्तर दाखल करण्यास तीन आठवड्याचा वेळ दिला यासंदर्भात १८ डिसेंबर रोजी न्या सुनील शुक्रे व न्या अविनाश घारोटे यांच्या न्यायालायत सुनावणी होती मात्र दोन दिवसांपूर्वी प्रकाश खंडारे यांनी दाखल केलेली याचिका अचानक मागे घेत असल्याचे शपथपत्र दाखल केले न्यायालयाने खंडारे यांची याचिका मान्य केली आहे.

  सेवाजेष्ठता यादीत खंडारे पहिल्या क्रमांकावर
  मुख्य अभियंता सरळ सेवा भरती २०१७ प्रक्रियेत एकूण १२ उमेदवारांनी मुलाखाती दिल्या होत्या डिमोशन करण्यात आलेले प्रकाश खंडारे व नव्याने मुख्य अभियंता पदावर नियुक्ती झालेले पंकज नागदेवते सोडले तर सर्वच उमेदवार सेवानिवृत्त झाले आहे खंडारे यांना मुख्य अभियंता पदावरून पायउतार करण्यात आले आहे ते उपमुख्य अभियंता पदावर खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत असून त्यांना मुख्य अभियंता पदाचा पदभार देण्यात आला आहे डिमोशन करण्यात आलेल्या आदेशात खंडारे यांना सेवाजेष्ठता यादीत पहिल्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे त्यामूळे खंडारे यांची पदोन्नती निश्चित मानली जात आहे खऱ्या अर्थाने खंडारे यांना मागील तीन वर्षांपासून देण्यात आलेले लाभ परत घेणे नियमानुसार अपेक्षित आहे मात्र त्यांना खैरात वाटल्या सारखा निर्णय महानिर्मिती कंपनीने घेतला आहे त्यामूळे कुठं तरी भिजत घोगडं घेतल्या सारखी स्थिती आहे.

  प्रकाशगड कार्यालयाच्या आदेशावरून उच्च न्यायालयात याचिका मागे
  डिमोशन करण्यात आलेले उपमुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांची नियुक्ती नियमबाह्य पद्धतीने झाली हे सर्वमान्य आहे चौकाशी समितीत दोषी असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे महानिर्मिती कंपनीने खंडारे यांचे डिमोशन केले मुळात चुकीच्या पद्धतीने खंडारे यांची मुख्य अभियंता पदावर निवड झाली मात्र “उलटा चोर कोतवाल को दाटे” म्हणत व्यवस्थापनाच्या विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यामूळे प्रकाशगड कार्यालयात नाराजीचा सूर उमटला त्यामुळे व्यस्थापनाशी दोन हात करने खंडारे यांच्या अंगलट येणार होते शिवाय महानिर्मिती कंपनीला उच्च न्यायालयात खंडारे यांचे डिमोशन का केले याचे उत्तर दाखल करायचे होते त्यामूळे “‘तेरी भि चूप मेरी चूप” च्या अवस्थेत असल्यामुळे उच्च न्यायालयातून याचिका मागे घेण्याचा सल्ला प्रकाशगड कार्यालयाने दिला असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.

  प्रकाश खंडारे यांची वादग्रस्त भूमिका
  खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात कार्यरत डिमोशन करण्यात आलेले उपमुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांची भूमिका नेहमी वादग्रस्त राहिली आहे कर्मचारी संघटना यांच्या दबावामुळे त्यांनी अनेक निर्णय मागे घेतले आहे खापरखेडा औष्णिक वीज केंद्रा मूळे प्रदूषण मोट्या प्रमाणात वाढले आहे मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची हेतुपुरस्सर दिशाभूल करण्यात येत आहे खंडारे यांना डॉ नितीन राऊत यांचा विशेष आशिर्वाद प्राप्त असल्यामुळे खंडारे यांना प्रकाशगड कार्यालयाचे अभय आहे खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात मागील तीन आठवड्या पासून मुख्य अभियंत्यांचे पद रिक्त आहे हि विद्युत क्षेत्रात नामांकित कंपनी असलेला महानिर्मिती कंपनी साठी शोकांकिता आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145