| | Contact: 8407908145 |
    Published On : Thu, Dec 10th, 2020

    टाकळी सीम जलकुंभावरील गळतीदुरुस्तीसाठी १२ तासांचे शटडाऊन ११ डिसेंबर शुक्रवार रोजी

    नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी सर्व नागपूरकरांना स्वच्छ व उरक्षित पाणी देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून पुन्हा एकदा वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. याच मोहिमेंतर्गत मनपा-OCW ११ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान नेहरू नगर झोनमधील सर्व जलकुंभांची स्वच्छता करणार आहेत.

    या दरम्यान नंदनवन (जुने) जलकुंभ ११ डिसेंबर (शुक्रवार) रोजी, नंदनवन २ जलकुंभ १४ डिसेंबर (सोमवार), नंदनवन प्रस्तावित १ जलकुंभ १६ डिसेंबर (बुधवार), सक्करदरा ३ १८ डिसेंबर (शुक्रवार), सक्करदरा २ १९ डिसेंबर (शनिवार) व सक्करदरा १ जलकुंभ २१ डिसेंबर (सोमवार) रोजी स्वच्छ करण्यात येतील.

    सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. स्वच्छतेच्या कामामुळे त्या त्या जलकुंभावर अवलंबून असलेल्या भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील. यादरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने मनाप-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

    नंदनवन जलकुंभ स्वच्छतेमुळे ११ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बाधित राहणार असलेले भाग: नंदनवन, नंदनवन लेआऊट, LIG, MIG, HIG, NIT, कवेलू क्वार्टर, कीर्ती नगर, प्रशांत नगर, व्यंकटेश नगर, नंदनवन स्लम, राजेंद्र नगर, हसनबाग स्लम, म्हाडा क्वार्टर, नंदनवन हाऊसिंग बोर्ड कॉलोनी

    नंदनवन २ जलकुंभ स्वच्छतेमुळे १४ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बाधित राहणार असलेले भाग: शेष नगर, शक्तीमाता नगर, श्रीकृष्ण नगर, विद्या नगर, विद्या नगर, वृंदावन नगर, गंगा विहार कॉलोनी, गोपाळकृष्ण नगर, शिवणकर स्लम, संताजी नगर

    नंदनवन प्रस्तावित जलकुंभ स्वच्छतेमुळे १६ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बाधित राहणार असलेले भाग: बापू नगर, गुरुदेव नगर, ताजबाग स्लम, हरपूर, सिंधीबन, संतोषी मत नगर व भांडे प्लॉट

    सक्करदरा ३ जलकुंभ स्वच्छतेमुळे १८ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बाधित राहणार असलेले भाग: रुक्मिणी नगर, गुरुदेव नगर, श्रीराम नगर, संजय गांधी नगर

    सक्करदरा २ जलकुंभ स्वच्छतेमुळे १९ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बाधित राहणार असलेले भाग: महालक्ष्मी नगर, श्रीनगर, लाडीकर लेआऊट, जवाहर नगर, जुना सुभेदार लेआऊट, सुर्वे लेआऊट

    सक्करदरा २ जलकुंभ स्वच्छतेमुळे २१ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बाधित राहणार असलेले भाग: आशीर्वाद नगर, बँक कॉलोनी, भांडे प्लॉट, सेवादल नगर, सोलंकीवाडी, जुना सक्करदरा. राणी भोसले नगर, सोनगारी नगर

    मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

    For information please do contact @ NMC-OCW’s Toll Free Number 1800 266 9899 at any time.

    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145