स्वरानंदच्या विद्यार्थ्यांचा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम “यादें नयी पुरानी” ने वेगळीच उंची गाठली
नागपुर– स्वरानंद अकादमी नागपूर तर्फे स्वरानंदच्या विद्यार्थ्यांचा एक फेसबुक लाईव्ह कार्यक्रम “यादें नयी पुरानी” नुकताच आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम टेलिकॉम नगर स्थित सूर संगम स्टुडिओ येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरातील सुप्रसिद्ध गायक आणि राष्ट्रीयरत्न पुरस्कृत अविनाश घोंगे उपस्थित होते. त्यांच्या निवेदनामुळे कार्यक्रमाने एक वेगळीच उंची गाठली. विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव त्यांनी नागपूरातीलच सुप्रसिद्ध गायिका सुरभी ढोमणे यांच्या सोबत एक युगुलगीत आणि त्यांचे एक एकलगीत सादर केले.
स्वरानंदचे विद्यार्थी सुलभा मांडेकर, राखी काटोलकर, जया महादुरे, सारिका लांजेवार, भाग्यश्री औथनकर, वैष्णवी कुंबलवार, अर्चना पडेगांवकर, मौसमी बिसेन प्रशांत भगत, गजानन माहुलकर, राजीव आर्या ह्यांनी सदाबहार गीते सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. सचिन ढोमणे (तबला), महेन्द्र ढोले (सिंथेसायजर) आणि सुभाष वानखेडे (आॅक्टोपॅड) ह्या वादक कलाकारांनी अतिशय पोषक साथ-संगत केली.हा कार्यक्रम स्वरानंदचे सर्वेसर्वा काकासाहेब तुमाने यांनी प्रायोजित केला.