| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Dec 11th, 2020

  अपूर्ण कामांबाबात भरतवाडा येथील नागरिकांचे स्थायी समिती सभापतींना निवेदन

  नागपूर : मागील दिवसांपासून अपूर्णावस्थेत असलेली कामे पूर्ण करण्याच्या मागणीबाबत भरतवाडा येथील नागरिकांद्वारे मनपा स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांना निवेदन देण्यात आले. मनपा मुख्यालयातील स्थायी समिती सभापती कक्षामध्ये नागरिकांनी सभापती विजय (पिंटू) झलके यांची भेट घेतली.

  शिष्टमंडळामध्ये बंडू पिल्लेवान, नंदलाल बिसेन, किशोर नागपूरे, हरीश जयस्वाल, अयुब कुरेशी, हितेश रंगारी, सुनील देशभ्रतार, उदय शर्मा, संजय पालांदूरकर आदी उपस्थित होते.

  भरतवाडा येथे मागील अनेक दिवसांपासून गडर लाईन, सिमेंट रस्ते आणि पावसाळी नाल्यांचे बांधकाम सुरू करण्यात आले. कोव्हिडचा संसर्ग वाढला असताना लागू झालेल्या लॉकडाउनमध्ये ही सर्व कामेही बंद करण्यात आली. मात्र आज ‘अनलॉक’ होउन महिने होत आहेत.

  मात्र अद्यापही बंदावस्थेतच आहेत. अपूर्ण कामांमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय अनेक ठिकाणची अपूर्ण कामे नागरिकांच्या जीवाला धोकाही ठरत आहेत. त्यामुळे सदर कामांच्या पूर्णतेबाबतचे अडथळे दूर करून लवकरात लवकर परिसरातील सर्व कामे सुरू करावे, अशी मागणी यावेळी भरतवाडा येथील नागरिकांनी निवेदनामार्फत केली आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145