स्केटिंग रिंक लवकरात-लवकर सुरु करा : चिखले
नागपूर : नागपूर महानगरपालिका क्रीडा समितीचे सभापती श्री. प्रमोद चिखले यांनी मंगळवारी (१२ जाने.) ला डागा ले-आऊट येथील स्केटिंग रिंक चा दौरा केला. नागपूर सुधार प्रन्यासची ही स्केटिंग रिंक नागपूर मनपाला हस्तांतरित करण्यात आली आहे.
ही स्केटिंग रिंक कोव्हीड -१९ च्या नियमांचे पालन करत लवकरात-लवकर जनतेसाठी उघडण्याचे निर्देश श्री. चिखले यांनी दिले. या विषयावर ते मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांच्याशी चर्चा करणार आहेत.
यावेळी नगरसेवक श्री. सुनील हिरणवार, क्रीडा अधिकारी श्री. पियुष आंबुलकर, श्री.जितेन्द्र गायकवाड, श्री. प्रफुल्ल वानखेडे आणि मिथुन बोभणे उपस्थित होते. श्री. चिखले यांनी स्केटिंग रिंग वर सराव करणा-या लहान मुलांशीपण चर्चा केली.