| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Dec 29th, 2020
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  हिंगणा एमआयडीसी मधील स्पेसवूड कंपनीला मोठी आग

  दिड तासापासून अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू

  आजुबाजूच्या कंपन्यांना अद्याप तरी कोणताही धोका नाही

  आगीत सध्यातरी कोणतीही जिवीत हानी नाही

  नागपुर: नागपुरातील हिंगणा औद्योगीक वसाहतीत मध्ये असलेल्या एका फर्निचर कंपनीला दुपारी साडे चार च्या सुमारास मोठी आग लागली आहे. स्पेसवूड नामक ही कंपनी आहे. आज सायंकाळच्या सुमारास साडे चार वाजता अचानक मोठी आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नागपुर महापालिकेचे अग्निशमन दलाच्या पथकांनी पाण्याचा जोरदार मारा सुरू केला आहे. आगीनं रौद्र रूप धारण केल्याने लांब अंतरावरूनही आगीचे आणि धुराचे लोट दिसतायेत. आगीच्या घटनेनंतर तुर्तास तरी कोणत्याही जिवित हानीची अद्याप तरी महिती नाही. ज्या कंपनीत आग लागली त्या कंपनीत लाकुड मोठ्या प्रमाणात असल्याने आग अतिशय वेगाने पसरली आहे.

  आग विझविण्याचे प्रयत्न युध्दस्तरावर सुरू आहे. अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग स्पेसवूड कंपनी पुरती मर्यादीत ठेवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. स्पेसवूड कंपनीच्या अवतीभवती ही आग पसरली नाही. सुमारे दिड तासापासून अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांचे आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145