| | Contact: 8407908145 |
    Published On : Tue, Dec 8th, 2020

    उद्या पासून शंकर नगर चौक आणि रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्टेशन नागरिकांच्या सेवेत

    – आता १८ मेट्रो स्टेशन स्टेशन वरून सुटणार मेट्रो ट्रेन

    नागपूर : शंकर नगर चौक आणि रचना रिंग रोड जंव्कशन मेट्रो स्टेशनला रेल्वे सुरक्षा आयुक्त यांनी या मेट्रो स्टेशन येथून प्रवासी सेवा सुरु करण्या संबंधीचे प्रमाणपत्र महा मेट्रोला प्रदान केले असून उद्या दिनांक ०९ डिसेंबर पासून सदर मेट्रो स्टेशन नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत. सिताबर्डी इंटरचेंज आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान धावणारी प्रत्येक मेट्रो गाडी या दोन्ही ही स्थानकांवर दर १५ मिनिटाने थांबेल.

    मेट्रो स्टेशन उद्या पासून नागरिकांकरिता खुले सप्टेंबर महिन्यात अजनी चौक, रहाटे कॉलोनी, एलएडी चौक आणि बंसी नगर मेट्रो स्टेशन नागरिकांच्या सेवेत दाखल झाले होते व उद्या पासून आणखी २ नवीन मेट्रो स्टेशन प्रवाश्याच्या सेवेत दाखल होत आहे. सीएमआरएसचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे १६ मेट्रो स्टेशनच्या ऐवजी आता १८ मेट्रो स्टेशन (ऑरेंज लाईन मार्गिकेवरील ०८ मेट्रो स्टेशन व अँक्वा लाईन मार्गिकेवरील १० मेट्रो स्टेशन) येथून मेट्रो सेवा नागरिकांकरिता उपलब्ध असतील.

    उत्तर अंबाझरी मार्गावरील शंकर नगर चौक आणि रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्टेशन ‘अँक्वा थीम’ वर बनविण्यात आले आहे. शंकर नगर चौक (६९९६.००) वर्ग मीटर क्षेत्रांमध्ये मेट्रो स्टेशनची उभारणी करण्यात आली असून या स्टेशनच्या परिसरात शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालय, बँक, बाजारपेठ तसेच मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या स्टेशनचा परिसरातील नागरिकांना निश्चितच लाभ होणार आहे.

    या व्यतिरिक्त रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्टेशनची (३४८८.०७) वर्ग मीटर क्षेत्रांमध्ये उभारणी करण्यात आली आहे व या स्टेशनच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात लोक वस्ती आहे. तसेच सदर स्टेशन हिंगणा टी पॉईंट वर असून, या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात नागरिक हिंगणा व सिताबर्डीच्या दिशेने ये – जा करतात. या स्टेशनच्या मार्गावर शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहत, वसतीगृह, मोठी बाजारपेठ असल्यामुळे या परिसरात प्रवाश्यांची नेहमीच गर्दी असते त्यामुळे आता सदर मेट्रो स्टेशन खुले झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे. या दोन्ही स्टेशनच्या (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन/निर्गमनची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. ग्राउंड लेव्हल, कॉनकोर्स लेव्हल आणि प्लॅटफॉर्म अश्या तीन मजलीच्या दुसऱ्या म्हणजेच कॉनकोर्स लेव्हलवर तिकीट काउंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात आले आहे.

    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145