| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jan 18th, 2021

  सावनेर- कळमेश्वर विधानसभेत सुनील केदारांचे एकहाती वर्चस्व

  -१७ पैकी १७ ग्रामपंचायतवर काँग्रेसचा झेंडा

  सावनेर – मागील वर्षी झालेल्या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकीत मंत्री सुनील केदारांच्या व्यूहरचने मुळे काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता स्थापन झाली होती तीच जादू कायम ठेवत सावनेर- कळमेश्वर विधानसभेतील संपूर्ण १७ ग्रामपंचायतीवर यावेळी सुद्धा काँग्रेस पक्षाचा झेंडा अभेद्य पणे फडकला आहे.

  या निवडणुकीकरिता क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सूक्ष्म नियोजन केले होते. प्रत्येक गावातील ग्रामपंचायत वर अगदी बारीक लक्ष ठेवून व आपल्या निवडणूक व्यूहरचने मुळे संपूर्ण ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व स्थापित झाले.

  सुनील केदार यांच्या स्वतःच्या पाटणसावंगी ग्रामपंचायतीवर सुद्धा एक हाती सत्ता प्रस्थापित करण्यात सुनील केदार यांना यश आले. पाटणसावंगी येथील १७पैकी १६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहे.

  यावेळी मंत्री सुनील केदार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व यापुढे लोकप्रतिनिधी म्हणून तळागाळातील नागरिकांना न्याय देण्याकरिता सर्व नवनिर्वाचित सदस्यांना आव्हाहन केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145