| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jan 14th, 2021

  मेट्रो स्टेशनवर संक्रांत साजरा झाली,मेट्रो प्रवाश्यांना तीळ गूळ वाटप

  – महिला कर्मचाऱ्यानी महिला प्रवाश्यांना दिले हळदी कुंकू,सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ अंतर्गत धावत्या मेट्रो ट्रेन मध्ये हळदी कुंकूचा कार्यक्रम

  नागपूर – आज मकर संक्रातीच्या पार्श्वभूमीवर मेट्रो स्टेशन येथे स्टेशन परिसरातील महिला कर्मचाऱ्यानी मेट्रो प्रवाश्याना तीळ गूळ वाटप करून मकर संक्रात साजरा केला. संक्रमणाच्या या सणाच्या शुभेच्छा महिला कर्मचाऱ्यांनी दिल्या.

  महिला प्रवाश्यांना हळदी-कुंकू देत सुखद मेट्रो प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. प्रवाशांच्या सोइ करिता महा मेट्रोच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत याच अनुषंगाने महा मेट्रोच्या वतीने १७ जानेवारी पर्यंत मकर संक्रांतीच्या निमित्याने मेट्रो स्टेशन येथे कार्निवलचे आयोजन केले आहे. या नव्या सर्व योजनांना नागपूरकरांनी नेहमीच चांगला प्रतिसाद दिला असून आज देखील महिलांनी याचा आनंद घेतला.

  महा मेट्रो तर्फे विविध प्रकारचे स्टॉल्स सीताबर्डी इंटरचेंज येथे लावण्यात आले असून मेट्रो प्रवासी याचा लाभ घेत आहे. तसेच सेलिब्रेशन ऑन व्हील्स’ या योजने अंतर्गत आता महिला हळदी-कुंकूचा कार्यक्रम धावत्या गाडीत देखील करू शकतात. मकर संक्रातच्या निमित्याने हि अनोखी सोय महा मेट्रोने उपलब्ध करून दिली आहे.

  या शिवाय जय प्रकाश नगर, सिताबर्डी इंटरचेंज व सुभाष नगर मेट्रो स्टेशन येथे हळदी कुंकूंच्या कार्यक्रम करता यावा या करिता विशेष सुविधा करण्यात आली आहे. संक्रमणाच्या या उत्सवाच्या निमित्ताने ही विशिष भेट महा मेट्रोच्या वतीने महिलांकरिता योजिली आहे. यामुळे महिलांनी या योजनेचा अधिकाधिक लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महा मेट्रोच्या वतीने करण्यात आले आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145