| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jan 21st, 2021

  मानकापूर येथे ३ दिवसात सेफ्टी मिरर लागणार

  – प्रहारच्या निवेदनाला यश

  नागपुर– कोणत्याही शहराच्या विकासाकरिता महामार्ग खूप महत्वाचे असते. या महामार्गामुळे शहरात दळणवळनाच्या सोयी मुळे शहराच्या विकासात मोठे योगदान असते. परंतु कधी कधी अश्या महामार्गावर पर्यायी व्यवस्था नसल्याने अपघाताची शक्यता मोठ्या प्रमाणात होत असते.

  अशीच परिस्थिती पश्चिम नागपुरातील मानकापूर येथील उड्डाणपुलावर घडत आहे. मानकापूर येथील अलेक्सिस हॉस्पिटल येथे असलेला अंडरपास हा अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. या बोगद्यात सेफ्टी मिरर नसल्याने अनेक अपघात तिथे घडत असतात. अलेक्सिस हॉस्पिटल कडे जाणाऱ्या रुग्णवाहिका या बोगद्यातून जातांना मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा असल्यामुळे कित्येकदा रुग्णांना त्रास होत असतो.

  या सर्व त्रासामुळे प्रहार जनशक्ती पक्ष नागपूर शहराच्या वतीने यापूर्वी सेफ्टी मिरर लावणे करिता राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला निवेदन दिले होते. परंतु महामार्ग प्रशासनाने कोणतीही कारवाही केली नाही. परंतु आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग कार्यालय गाठून जो पर्यंत सेफ्टी मिरर लागत नाही तो पर्यंत राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात ठिया आंदोलन करण्यात आले. प्रहारचा आक्रमक पवित्रा बघत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने त्वरित प्रहारच्या शिष्टमंडळा सोबत मानकापूर येथे जाऊन पाहणी केली व येत्या ३ दिवसात सेफ्टी मिरर लावण्याचे आश्वासन दिले.

  सदर ठिया आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात व प्रहार जनशक्ती पक्ष नागपूर शहर समन्वयक शबिना शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी प्रमुख रूपाने प्रहारचे शहर अध्यक्ष राजेश बोढारे,संपर्क प्रमुख प्रशांत तन्नेरवार, उपाध्यक्ष ऋषी कुंवर, महासचिव नकुल गमे, युवा प्रमुख आसिफ शेख, दिनेश धोटे, शुभम उघड़े, अरमान खान व मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145