Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Dec 17th, 2020

  राजस्थानी महिला मंडळाची सफर-ए-मेट्रो

  नागपूर : कोरोनाच्या काळात घरात बंदिस्त राहून कंटाळलेल्या राजस्थानी महिलांसाठी घराबाहेर निघून निसर्ग रम्य वातावरणातील मेट्रो सफर मरगळ घालवणारी ठरली. अनेक महिने मनाला आनंद होईल अश्या कुठल्याच घडामोडी घडल्या नसतांना आज अचानक इतक्या महिन्यांनी आमच्या मनात पुन्हा आनंद नागपूर मेट्रोने पार्तवला आहे असे मत राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती किरण मुंदडा ह्यांनी व्यक्त केले. सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या राजस्थानी महिला मंडळ’ च्या ४० महिलांनी दि. १७ डिसेंबर गुरुवार रोजी नागपूर मेट्रोच्या ऑरेंज लाईनवर मेट्रो सफर केली. सीताबर्डी इंटरचेन्ज मेट्रो स्थानकापासून सुरु झालेला हा प्रवास खापरी मेट्रो स्टेशन ते पुन्हा परत सीताबर्डीला येऊन थांबला. दरम्यान त्यांनी न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवर उतरून संपूर्ण स्टेशनची पाहणी केली.

  या स्थानाकावर स्थापन करण्यात आलेल्या गौतम बुद्धांच्या मूर्तीजवळ त्यांनी फोटो काढले. या प्रवासात महिलांनी नागपूर मेट्रोच्या स्थनाकावरील अंतर्गत सज्जा, स्वच्छता, सुरक्षेसाठी करण्यात आलेली व्यवस्था, मेट्रो स्थानकापासून मेट्रो ट्रेनमध्येसुद्धा करण्यात आलेल्या सोयी-सुविधा यांचा आढावा घेतला. विशेषतः स्थानकांवर महिलांसाठी असलेली सुविधा, उदाहरणार्थ गरोदर महिलांसाठी किंवा छोट्या बाळांच्या आई असणाऱ्या महिलांना फीड करण्यासाठी रेस्ट रूम, महिलांसाठी विशेष बाथरूम्स याबद्दलची माहिती त्यान्ना देण्यात आली. मेट्रो गाडीला असलेला महिला विशेष कोच पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला आणि त्याच कोचने या महिलांनी हा संपूर्ण प्रवास पार पाडला.

  राजस्थानी महिला मंडळच्या मीर मालपाणी ह्यांनी मेट्रो स्थानकात प्रवेश करतांनाच होत असलेल्या आरोग्य तपासणीबद्दल समाधान व्यक्त केले. शारीरिक तापमान तपासणी तसेच संपूर्ण सॅनिटायझेशन, त्यानंतर तिकीट काढतांना परत हातात मिळणारे पैसेसुद्धा सॅनिटाईज झालेले असतात ह्याचे त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी प्लॅटफॉर्मपासून, लिफ्ट आणि मेट्रोतील सिटटींगपर्यंत करण्यात आलेल्या अरेंजमेंट्स यावर त्यांनी समाधान तसेच मेट्रोत प्रवास करणाऱ्या प्रत्येकाने हे नियम पाळायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले

  राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्ष श्रीमती किरण मुंदडा यांच्या मार्गदर्शनात या महिलांनी हा सफर अत्यंत आनंदाने पार पाडला. कोरोना काळात जी जी काळजी घयायला हवी ती सर्व या मेट्रोच्या प्रवासात व्यवस्थित घेतली जात असल्याने महिलानीं त्याच्या कुटुंबासह इतर कोणताही प्रवास टाळून, स्वतःच्या गाड्या घरीच ठेवून सुरक्षीत आणि सोयीचा असा मेट्रोनेच प्रवास करावा असे किरण आवाहन करताना दिसल्या.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145