| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jan 15th, 2021

  उन्नती प्रतिष्ठानावर आरपीएफची धाड

  -रेल्वे ई तिकीटांचा काळाबाजार,खाजगी आयडीवरून काढायचा तिकीट,मोतीबाग पथकाची धाड


  नागपूर– रेल्वे ई – तिकीटांचा काळाबाजार करणाèया उन्नती काम्प्युटर, खापरखेडा येथे मोतीबाग आरपीएफच्या पथकाने धाड मारली. धर्मपाल देशभ्रतार असे त्यांचे नाव आहे. प्रतिष्ठानाच्या झाडाझडतीत १० हजार रुपये qकमतीचे ई तिकीट आणि सामग्री असा एकूण २५ हजार रुपये qकमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आली.

  कोरोनानंतर हळू हळू जीवनमान सुरळीत झाले. रेल्वे गाड्या आणि प्रवासी संख्या वाढू लागली. प्रत्येकालाच कन्फर्म बर्थ पाहिजे. प्रवाशांची अडचन असल्याने रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणारे सक्रीय आहेत. धर्मपाल देशभ्रतार याचे उन्नती कंम्प्युटर या नावाने खापरखेडा येथे प्रतिष्ठान आहे. तो खाजगी आयडीवरून रेल्वे ई तिकीट काढून प्रवाशांना विक्री करायचा. त्यावर नियमानुसार कमिशन घेत नव्हता. ही माहिती आरपीएफच्या पथकाला मिळाली. पथकाने या प्रकरणाची खात्री करून घेतली.

  मोतीबागचे आरपीएफ निरीक्षक गणेश गरकल यांच्या नेतृत्वात उप निरीक्षक राम सिंह मीणा, प्रकाश रायसेड़ाम, विजय विठोले, पुनम यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळच्या सुमारास धर्मपाल देशभरतार यांच्या उन्नती कम्प्युट या प्रतिष्ठानावर धाड मारली.

  झाडाझडतीत १० हजार ३५ रुपये qकमतीच्या १२ तिकीट मिळाले. या शिवाय संगणक, एक मोबाईल, एक qप्रटर याशिवाय ग्राहकाची तिकीटांसाठी असलेले ३५० रोख असा एकूण २५ हजार ३५ रुपये जप्त केले. या प्रकरणी मोतीबाग आरपीएफ ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास उप निरीक्षक उषा बिसेन करीत आहेत. विशेष मोहीम दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे सुरक्षा आयुक्त पंकज चुघ यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145