| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Jan 4th, 2021
  maharashtra news | By Nagpur Today Nagpur News

  ‘रोकडे ज्वेलर्सचा मौल्यवान नवग्रह राशिरत्न खजिना ग्राहकांच्या भेटीला!’

  तीन पिढ्यांपासून दागिनेनिर्मितीची वैभवशाली परंपरा जपणाऱ्या ‘रोकडे ज्वेलर्स’ने आपल्या दागिन्यांच्या वैविध्यपूर्णता, अद्वितीय कलानिर्मिती आणि अतुलनीय शुद्धतेमुळे नागपूरवासियांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. आणि ते अढळ स्थान तीन पिढ्यांपासून अबाधित देखील ठेवले आहे. सर्वांचे आवडते दागिने एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे सुवर्णदालन म्हणून आज रोकडे ज्वेलर्सची सर्वत्र ओळख आहे. सोने, चांदी, हिरे, जडजवाहीर, मोती इत्यादी पासून बनलेले नाविन्यपूर्ण दागिने हे रोकडे ज्वेलर्सचे वैशिष्ट्य आहेच. मात्र यासोबतच रोकडे ज्वेलर्सची एक खास ओळख आहे. आणि ती म्हणजे रोकडे ज्वेलर्स येथे उपलब्ध असणारे मौल्यवान ‘नवग्रह राशीरत्न’…!

  ग्राहकांची आवड आणि मागणी लक्षात घेऊन रोकडे ज्वेलर्स यांनी नवग्रह राशीरत्नांचे खास कलेक्शन आकर्षक डिजाईन्ससह सर्वांच्या भेटीला आणले आहे. जीवनातील लाभप्राप्ती, आनंद आणि सुख समाधानासाठी नवग्रह राशिरत्न यांचे खूप महत्व मानल्या जाते. हे वैशिष्ट्यपूर्ण नवग्रह राशिरत्न कलेक्शन रोकडे ज्वेलर्स यांच्या नागपूर शहरातील लक्ष्मीनगर, महल , इतवारी, एअरपोर्ट या सर्व शोरूममध्ये उपलब्ध आहेत. नवग्रह राशिरत्न आभूषणांमध्ये आपले खास वैशिष्ट्य जपणारे रोकडे ज्वेलर्स हिरा, पन्ना, मोती, पुष्कराज, नीलम, माणिक, लसण्या, गोमेध, मुंगा ही सर्व नऊ प्रकारचे नवरत्न ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध करून देतात.

  ही सर्व नऊ प्रकारचे नवग्रह राशिरत्न आपापले विशेष महत्व जपून आहेत. हिरा हा शक्ती आणि संपत्तीचे प्रतीक आहे. पन्ना हा रत्न शक्ती आणि सुरक्षा यासाठी आपली ओळख जपून आहे. नीलम हा प्रेम आणि संपत्तीचे प्रतीक आहे. पुष्कराज हा रत्न आर्थिक सुबत्ता प्रदान करण्यासाठी ओळखला जातो. मोती हा रत्न समृद्धी व संपन्नता प्रदान करतो. माणिक हा रत्न दीर्घायुष्य आणि यश प्रदान करण्यासाठी ओळखला जातो. लसण्या रत्न हा रोग आणि धोक्यांपासून संरक्षण करतो. गोमेध हा रत्न दीर्घायुष्य व आरोग्य प्रदान करतो. तर मुंगा आपणास प्रबळ सामर्थ्य प्रदान करते.

  यापैकी कुठल्या प्रकारचा नवग्रह राशीरत्न आपल्याला राशी नुसार लाभदायी आहे हे राशीरत्न वापरण्यापूर्वी जाणकारांकडून जाणून घेणे आवश्यक आहे. मात्र यात विशेष आनंदाची बाब ही आहे कि; राशी नुसार कुठले नवग्रह रत्न वापरावे, त्यांची लाभप्राप्ती व महत्व अशी सर्व नवग्रह रत्नांची ईत्यंभूत शास्त्रशुद्ध माहिती रोकडे ज्वेलर्स यांच्या विशेषज्ञांमार्फत ग्राहकांना मोफत उपलब्ध आहे. यासोबतच नवग्रह रत्नांविषयी ‘रोकडे ज्वेलर्स’ मोफत जोतिषशास्त्र सल्ला देखील उपलब्ध करून देत आहे. नवग्रह रत्न खरेदी करण्याचा ग्राहकांचा ओढा जाणून नवग्रह राशीरत्नांचे खास कलेक्शन आकर्षक डिजाईन्ससह सर्वांसाठी रोकडे ज्वेलर्सच्या सर्व शोरुमवर उपलब्ध आहे. ग्राहकांचा यास उस्फुर्त प्रतिसाद देखील मिळत आहे. तर मग या असंख्य ग्राहकांप्रमाणेच तुम्ही कधी येत आहात तुमच्या आवडीचे नवग्रह राशीरत्न खरेदी करण्यासाठी?

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145