| | Contact: 8407908145 |
    Published On : Mon, Jan 18th, 2021

    प्लास्टिक पतंग विक्रेत्यांना तीन हजारांचा दंड

    नागपूर : संक्रांतीच्या पर्वावर पतंगबाजीला उधाण येते. प्लास्टिक पतंग आणि नायलॉन मांजावर बंदी असतानाही त्याची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने डिसेंबर महिन्यापासून मनपातर्फे विक्रेत्यांवर कारवाई सुरू आहे. सोमवारी (ता. १८) नेहरूनगर झोन अंतर्गत तीन विक्रेत्यांवर कारवाई करत मनपाच्या उपद्रव शोध पथकाने तीन हजारांचा दंड वसूल केला.

    दहाही झोनमध्ये मिळून ६९ दुकानांची तपासणी करण्यात आली. यात नेहरूनगर झोनमधील तीन विक्रेत्यांकडे प्लास्टिक पतंग विक्रीसाठी असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडील १०३ पतंग जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात आली. या तीनही दुकानदारांकडून एकूण तीन हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145