| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jan 27th, 2021

  जुने सर्व रेकॉर्ड मोडत २६ जानेवारीला तब्ब्ल ५६,४०६ नागरिकांनी केला मेट्रोने प्रवास

  – प्रजासत्ताक दिनाला महा मेट्रोची ऐतिहासिक आणि विक्रमी रायडरशिप,महा मेट्रो : एव्हरी टाईम ऑन टाईम

  नागपूर – काल दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नागपूर मेट्रो रेल प्रवासी सेवामध्ये तुफान गर्दी आढळून आली काल तब्बल ५६,४०६ नागरिकांनी नागपूर मेट्रोच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन मार्गिकेवर मेट्रोने प्रवास केला. हा आता पर्यंतचा सर्वात मोठा ऊंचाक असून या आधीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे जो कि या पूर्वीच्या रेकॉर्ड रायडरशिप पेक्षा ३ पटीने जास्ती आहे. महत्वपूर्ण म्हणजे काल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्याने मेट्रो सेवा रात्री ९ वाजता पर्यंत उपलब्ध होती.

  या पूर्वी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची सर्वात जास्त रायडरशिप २७ डिसेंबर २०२० रोजी २२१२३ नोंदविण्यात गेली होती. नागपूर मेट्रोची २६ जानेवारी २०२१ रोजीची रायडरशिप देशातील इतर मेट्रो रेल प्रकल्पाच्या तुलनेत अग्रणीय होती. काल मोठ्या प्रमाणता मेट्रो स्टेशन येथे गर्दी आढळून आली व सिताबर्डी इंटरचेंज येथे जे कि जास्ती होती व तिकीट खरेदी करण्याकरता मोठ्या रांगा लागल्या होत्या. कॉनकोर्स येथे सकाळ पासून रात्री पर्यंत सतत मेट्रोने प्रवास करायची गर्दी आढळून आली.

  सुरभी ढोमणे (मेट्रो प्रवासी ):या पूर्वी अश्या प्रकारची गर्दी बघितली नव्हती पहिल्यांदा मेट्रो प्रवषयांची इतक्या मोठ्या प्रमाणात सांख्य बघून निश्चितच नागपूर मेट्रो रेल प्रकल्प आता आणखी भविष्यात फायद्याचा ठरणार आहे असे मत मेट्रो प्रवासी श्रीमती. ढोमणे यांनी व्यक्त केले.

  मेट्रो प्रवाश्यांमध्ये उत्साहाचे वातावरण :मेट्रो स्टेशन येथे शॉपिंग आणि कार्यक्रमाचे आयोजन प्रवाशांच्या सोईची बाब असून या सारखे उपक्रम पूढे सुरु ठेवावे असे मत स्थानिक व्यवसायी अनंत चोपडा यांनी व्यक्त केले.

  महा मेट्रोच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्याने मेट्रो स्टेशन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऑरेंज लाईन मार्गिकेवरील जय प्रकाश नगर मेट्रो स्टेशन व ऍक्वा लाईन मार्गिकेवरील सुभाष नगर मेट्रो स्टेशन आकर्षक रौषणाई ने सजविण्यात आले होते तसेच सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन येथे आकर्षक सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला होता. सुभाष नगर मेट्रो स्टेशन येथे सीआरपीएफ पथक द्वारे बँडचे सादरीकरण, सुरसंगम समूह तर्फे सचिन आणि सुरभी ढोमणे देश भक्ती गीताचा कार्यक्रम, त्रिविधा कला निकेतन ललित कला संस्थाच्या वतीने श्रीमती अवंती काटे व पूजा हिरवटे भारत नाट्यमचे प्रस्तुतीकरण तसेच रहाटे कॉलोनी मेट्रो स्टेशन येथे मुलांकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन, स्केटिंगचे सादरीकरण, सुभाष नगर मेट्रो स्टेशन येथे भाग्यश्री अकादमी व राग रॉक्स तर्फे संगीताचा कार्यक्रम व एयरपोर्ट मेट्रो स्टेशन येथे अक्षरायन तर्फे कॅलिग्राफी शो चे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये मेट्रो प्रवाश्यानी आनंद घेत स्पर्धे मध्ये सहभाग नोंदविला.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145