भाजप वैद्यकीय आघाडीतर्फे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते कोविड योध्यांचा सन्मान संपन्न
भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी नागपूर शहर व नागपूर जिल्हा ग्रामीण द्वारा कोविड 19 संक्रमणकाळात नागपुरातील आरोग्य सेवाभावी संघटना, रुग्णालय, डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, विविध क्षेत्रातील सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी कोरोना महामारीत आपल्या नागपुरात नरसेवा हीच नारायण सेवा हे ब्रीद मनात ठेवून माणुसकीच्या नात्याने केलेल्या ईश्वरीय सेवाकार्याबद्दल, राष्ट्रकार्याबद्दल त्यांचा कोवीड योद्धा सन्मान भारत सरकार चे केंद्रीय सडक परिवहन मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.या प्रसंगी अध्यक्ष म्हणून नागपूरचे नवनिर्वाचित महापौर मा श्री दयाशंकरजी तिवारी, राज्यसभा सांसद डॉ विकासजी महात्मे, भाजप ग्रामीणचे अध्यक्ष श्री अरविंदजी गजभिये, डॉ उदय बोधनकर, डॉ मिलिंद माने, डॉ राजीव पोतदार, आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी नागपुरातील विविध क्षेत्रामध्ये आरोग्य क्षेत्रात एम्स च्या संचालिका डॉ विभा दत्ता, राजेशजी रोकडे, डॉ मनीष श्रीगिरिवार, डॉ अजय केवालीया, डॉ अनिल पावशेकर, डॉ सौरभ अग्रवाल, आय एम ए च्या डॉ कोठारी , निमा चे डॉ मोहन येंडे, , आयुर्वेद व्यासपीठ चे डॉ प्रसाद देशपांडे, हिमपाम डॉ इडोळे , सेवांकुरचे सचिन जांभोरकर , मिशन विश्वास, फार्मारंभ, एम्स, इंदिरा गांधी रुग्णालय, शासकीय महाविद्यालय चे परिचारिका व डेंटल हॉस्पिटल चे अधिवक्ता तसेच पंजाबी डॉक्टर्स सेल चे डॉ अमित अरोरा, सेवन स्टार चे डॉ प्रशांत रहाटे, डॉ चंद्रशेखर गिल्लूरकर, डॉ सजल मित्रा, डॉ सुरज खरबडे, मनपाचे डॉ बहिरवार, डॉ सोनकुसरे, डॉ हरीश वरंभे, डॉ सौरभ पावडे, डॉ प्रदीप पाटील, सौ स्नेहल दाते, श्री विमलकुमार श्रीवास्तव, लोकमान्य चे एड रमण सेनाड, भंडारा तेथील अजित कुर्झेकर, आदी कोविड योध्याचा सेवाकार्याबद्दल सत्कार केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे हस्ते करण्यात आला.
वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स च्या कॉवीड 19 मधील सेवाकार्याला मी नतमस्तक होऊन नमस्कार करतो असे गौरवोद्गार नितीनजी गडकरींनी काढलेत व वैद्यकीय आघाडीला पुढील काळात लोकहिताच्या साठी आरोग्य शिबीर तसेच वेबिनार व जनजागृती साठी जे सहकार्य लागेल ते माझ्याकडून निश्चित होईल असं आश्वासन दिलं.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ गिरीशजी चरडे, संचालन डॉ श्रीरंग वराडपांडे यांनी केलं, तर आभार डॉ प्रीती मानमोडे यांनी मानलेत.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजप वैद्यकीय आघाडीचे डॉ अजय पारधी, डॉ छाया दुरूगकर, श्री संजय अवचट, ध्यानेश ढाकुलकर, डॉ प्रज्वल मोटघरे, यांनी प्रयत्न केलेत.