Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
    | | Contact: 8407908145 |
    Published On : Wed, Jan 27th, 2021

    गौरव सोहळ्या सोबतच मधुर स्वरांनी बहरली पत्रकारांची संध्याकाळ

    गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी व पुरस्कार विजेत्या पत्रकारांचा गौरव

    नागपूर: सुरेल स्वरांची साथ आणि गौरव सोहळ्याचा आनंद यांच्या संमिश्र अनुभूतीने प्रेस क्लब ऑफ नागपूर मधील संध्याकाळ बहरून गेली. गणराज्यदिना निमित्त नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व प्रेस क्लब ऑफ नागपूर च्या विद्यमाने मंगळवारी संध्याकाळी प्रेस क्लब सिव्हील लाईन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

    सर्वप्रथम कार्यक्रमात दिवंगत साहिल ब्रह्माशंकर त्रिपाठी आणि स्व. शोभा एस.एन.विनोद यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमास ज्येष्ठ संपादक एस.एन.विनोद हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात पत्रकारांच्या गुणवत्ताप्राप्त पाल्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यात सानिका परितोष विंझे, सिद्धेश आनंद मोहरील यांना पुरस्कृत करण्यात आले. पत्रकारितेच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावलेल्या ज्या पत्रकारांचा गौरव गेल्या वर्षभरात करण्यात आला होता, त्यांनाही यावेळी गौरवान्वित करण्यात आले.

    यात विनोद देशमुख, गजानन निमदेव, नरेश डोंगरे, सविता हरकरे, प्रभाकर दुपारे, संजय डाफ, गजानन उमाठे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात स्वरमधुरा या वाद्यवृंदाने सुरेल स्वरांची रंगत चढविली. देशविदेशात लोकप्रिय असलेल्या या वाद्यवृंदातील गायक राजेश दुरुगकर, स्वस्तिका ठाकूर व डॉ.पंकज गजभिये यांनी जुन्या व नव्या चित्रपटगीतांचे सादरीकरण करून श्रोत्यांची पसंती मिळवली. यावेळी श्रेया हेमंत सालोडकर हिनेही सुरेल गीत सादर केले.

    नरेश डोंगरे यांनी नरेंद्र चंचल यांचे “ यारा ओ यारा ” हे गीत सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. वाद्यवृंदसंचात कीबोर्डवर महेंद्र ढोले, तबल्यावर अशोक टोकलकर व आक्टोपॅडवर सुभाष वानखेडे यांची साथ होती. याप्रसंगी प्रेसक्लब व टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर यांच्यासह नागपुरातील अनेक ज्येष्ठ पत्रकार उपस्थित होते.


    Trending In Nagpur
    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145