| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jan 8th, 2021

  गोधनी रेल्वे कलेक्टर कॉलनीत गजानन मंदिराच्या परिसरात कामाचा अडथळा

  नागपुर – मानव कल्याण सामाजिक व सांस्कृतिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गोधनी रेल्वे, कलेक्टर कॉलनी निवासी, विधानसभा क्षेत्रातील खसरा. क्र. 64, प्रभात नगर येथे डांबरीकरण व रोड आणि रस्ते सुद्धा नाहीत. ह्या बाबतीत कित्येक वेळा ग्रामपंचायत व प्रादेशिक विकास प्राधिकरण या विभागाला गोधनी रेल्वे येथील अतिरिक्त काम करण्याकरिता 3 डिसेंबर 2020 मध्ये अधीक्षक अभियंता (NMC) विकास प्राधिकरण यांना निवेदन दिले.

  परंतु यावर काहीही कारवाई झाली नसून गजानन मंदिर परिसर वार्ड क्रं.3 येथील W B M चे उर्वरित काम व डांबरीकरण करण्याची मागणी केली. परंतु गजानन मंदिर परिसरातील काम झाले नाही. याकरिता भाजपचे आमदार समीर मेघे यांनीही एन.एम.सी विकास प्राधिकरण यांना आपले पत्र देऊन सुद्धा, काम केले नाही. मंजुरी सुद्धा मिळाली. परंतु गजानन मंदिर परिसरात काम झालेच नाही. तेथील नागरिकांच्या समस्या व रोज होणारा त्रास, त्यांना सहन करावा लागत आहे. कारण तेथे ग्रामपंचायत अंतर्गत काँग्रेसचे वर्चस्व असून तेथील कामांमध्ये अडथळे निर्माण होत आहे.

  नागपूर सुधार प्रन्यासचे विजय तांबडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता, त्यांनी तांत्रिक अडचण आहे. अस सांगितल आणि मला वरून आदेश नाही तर मी गजानन मंदिर परिसरातील काम करू शकत नाही. असे नागपूर सुधार प्रन्यासचे विजय तांबडेनी अध्यक्ष कमलेशसिंह ठाकूर यांना उत्तर दिले. परंतु नागरिकांची एकच मागणी आहे की,परिसरातील डांबरीकरण, रस्ते, व रोड करण्यात यावे. अशी मागणी कमलेशसिंह ठाकूर यांनी कलेक्टर व आमदार समीर मेघे यांना पत्राद्वारे दिली असून सुद्धा या कामांमध्ये चालढकल करीत आहे. असे निदर्शनास येत आहे. गेल्या वीस वर्षापासून मागणी आहे.

  तरी शासनाने या बाबतीत उचित कारवाई करावी अशी मागणी गोधनी रेल्वे कॉलनी येथील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय व नागपुर सुधार प्रन्यास येथे निवेदन दिल आहे. जर आमच्या समस्या सरकारने मान्य केल्या नाही तर आम्ही सरकार विरोधात आंदोलन करू ? असा इशारा दिलेला आहे. यावेळी सर्व नागरिक गण, किशोर राऊत, श्यामकुमार रहाटे, संदीप हरनाल, देवराव वैरागडे, अनिल अतकर, दयानंद सिंग, भीमरावजी गणभोज, आर्या निमजे, पप्पू मिसाळ, संदेश राहटे, सईद शाहीद, प्रमिला भारती, पूनम भारती, प्रदीप चंदनखेडे, नेहा रहाटे इत्यादी निवेदन देतेवेळी उपस्थित होते.असे एका प्रसिद्धी पत्रकात मानव कल्याण सामाजिक व सांस्कृतिक बउहुद्देशीय संस्था चे अध्यक्ष कमलेशसिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145