Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jan 15th, 2021

  आता जाहिरात, शुभेछा संदेश देणे झाले सोपे : स्मार्ट सिटीचा स्मार्ट उपक्रम

  नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलोपमेन्ट कॉर्पोरेशनं लिमिटेड ने नागपूर शहरात ५१ प्रमुख चौकात लागलेल्या व्हेरीएबल मेसेजिंग सिस्टिम (एल इ डी डिसप्ले) च्या माध्यमाने आपली आय वाढविण्याच्या दृष्टी ने पाऊले उचलेले आहे.

  नागपूर स्मार्ट सिटी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भूवनेश्वरी एस.भाप्रसे यांनी या बद्दल माहिती देतांना सांगितले की नागपूर सेफ अँड स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत व्ही ए एम एस च्या प्रमुख चौकात लागलेले आहे. याच्या माध्यमातून केंद्र शासन , राज्य शासन ची विविध योजनांची माहिती दिली जात आहे. या सोबत नागरिकांसाठी जनहितार्थ संदेश, शहरातील तापमान आणि हवामानाची माहिती सुद्धा दिली जात आहे. आता एक पाऊल पुढे टाकत स्मार्ट सिटीच्या व्ही ए एम एस च्या माध्यमाने नागरिकांना त्यांचे शुभकामना संदेश, जाहिराती देण्याची संधी उपलब्ध केली जात आहे. कुणी हि नागरिक आपला किंवा आपल्या मित्राचा, नाते वाईकांचा वाढ दिवस, लग्नाचा वाढदिवसाच्या शुभकामना संदेश किंवां प्रतिष्ठानांच्या प्रसिद्धीची जाहिरात व्ही ए एम एस च्या माध्यमाने प्रसारित करू शकतात. तसेच मोठे प्रतिष्ठान सुद्धा याचा उपयोग जाहिराती साठी करू शकतील.

  नागरिक कमीत कमी एका किंवा सर्व ५१ ठिकाणी त्यांची जाहिरात किंवा संदेश प्रसारित करू शकतात. जाहिरात टेक्स्ट, इमेज किंवा व्हिडीओच्या स्वरूपात दिली जाऊ शकते. या जाहिराती साठी लागणारे दर फारच कमी ठेवण्यात आलेले आहेत. वाढ दिवस , लग्नाचा वाढदिवस व अन्य शुभेच्छा संदेश फक्त रु १००० प्रतिदिवस, आणि व्यावसायिक जाहिरात सर्व ठिकाणी प्रसारित केल्यास प्रतिठिकाणी फक्त रु ८५० प्रति माह या दरावर उपलब्ध करण्यात आले आहे.

  नागपूर स्मार्ट सिटी ही मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भूवनेश्वरी एस यांच्या मार्गदर्शनात स्मार्ट सिटी आय चे नवीन साधने उत्पन्न करण्याची दिशेने काम करीत आहे. व्ही ए एम एस च्या माध्यमाने जाहिरातीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जाहिरातीसंबधी अधिक माहिती साठी स्मार्ट सिटीच्या ई-गवर्नेंस विभागाशी संपर्क साधावा. ईमेल: [email protected] दूरध्वनी क्रमांक: 18002331051, 0712-2567037


  व्ही ए एम एस च्या ५१ ठिकाणी ची यादी
  १) सावरकर नगर, २) शंकर नगर ३) ला कॉलेज चौक, ४) लॅडीस क्लब चौक, ५ ) मोहंमद रफी चौक ६) माटे चौक, ७) आकाशवाणी चौक, ८) जी पी ओ चौक, ९ ) भोळे पेट्रोल पंप चौक १० ) आर बी आई चौक ११) व्हरायटी चौक, १२ ) कोका कोला चौक १३ ) मॉरिस कॉलेज चौक १४ ) झाशी राणी चौक, १५ ) हिंगणा टी पॉईंट, १६) जुना अमरावती नाका , १७) नवीन काटोल नाका चौक, १८) रवी नगर चौक, १९) पागलखाना चौक २०) जरीपटका चौक, २१ ) जरीपटका चौक २२) इंदोरा चौक २३) कडबी चौक २४) कमाल चौक २५) आटोमाटिव्ह चौक, २६) कळमना मार्केट चौक २७ ) भारतवाडा चौक २८ ) महावीर चौक २९ ) हसनबाग चौक ३० ) सोना रेस्टॉरंट चौक, ३१) मेडिकल चौक, ३२) छोटा ताजबाग चौक ३३) अग्रसेन चौक ३४ ) मानस चौक ३५) महालगी नगर चौक ३६) जयस्तंभ चौक ३७) दही बाजार चौक ३८ ) प्रताप नगर चौक ३९ ) जुना काटोल नाका चौक ४०) अशोक चौक ४१) माऊंट कार्मेल शाळा चौक ४२) राम नगर चौक ४३) हॉटेल प्राईड च्या समोर , वर्धा रोड, ४४) मानकापूर क्रीडा संकुल, ४५) फुटाळा तलाव चौक, ४६) गोरेवाडा चौक ४७) के टी नगर काटोल रोड ४८) दिघोरी चौक ४९ ) क्रीडा चौक ५०) गोंडवाना चौक ५१) एल ए डी चौक .


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145