| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Jan 6th, 2021

  नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांची स्मृती मंदीरास भेट

  म.न.पा.चे नवनिर्वाचित महापौर श्री. दयाशंकर तिवारी व उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे यांनी आज बुधवारी (दि.६ जानेवारी) रोजी रेशीमबाग स्मृती मंदीर येथे जावून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार व व्दितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांचे स्मृती स्थळाचे दर्शन घेवून विनम्र अभिवादन केले.

  याप्रसंगी स्थायी समिती सभापती श्री. विजय (‍पिंटू) झलके, सत्तापक्ष नेता श्री.संदीप जाधव, प्रतोद श्रीमती दिव्या धुरडे, देवेन्द्र दस्तुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145