| | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Dec 17th, 2020

  एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावलीमुळे विकास कामांना नवी दिशा : शर्मा

  – मनपा, क्रेडाईच्या प्रशिक्षण कार्यशाळा मध्ये तज्ञांनी केले मार्गदर्शन

  नागपूर : एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली महाराष्टृ राज्यात लागू झाल्याने याच्यातुन विकास कामांना नवी दिशा प्राप्त होईल, असे मत नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी व्यक्त केले.

  गुरुवारी (१७ डिसेंबर) रोजी नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग सहसंचालक, नगर रचना, नागपूर विभाग, नागपूर , नागपूर महानगरपालिका आणि क्रेडाई नागपूर मेट्रो यांच्या वतीने प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन कविवर्य श्री. सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे करण्यात आले होते. श्री. जलज शर्मा यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करुन कार्यशाळेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी व श्री. संजय निपाणे, सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग श्री. अविनाश पाटिल, सह संचालक, नगररचना, नागपूर विभाग श्री.नितीन अढारी, सह संचालक, नगररचना, पुणे महानगरपालिका श्री. सुनिल मरळे, नागपूर महानगरपालिकेचे सहसंचालक, नगर रचना श्री. प्रमोद गावंडे, सेवानिवृत्त उपसंचालक श्री. संजय सावजी आणि अध्यक्ष क्रेडाई नागपूर मेट्रो श्री. महेश साधवानी, व्यासपीठावर उपस्थित होते.

  उदघाटन समारंभाला संबोधित करतांना श्री. जलज शर्मा म्हणाले की, आतापर्यंत संपूर्ण राज्यात वेगवेगळी विकास नियंत्रण नियमावली होती. यामुळे राज्याचे नागरी भागात विकासात असमतोल निर्माण झाला होता. वेगवेगळे नियमांमुळे ‍विकासकांना पण त्रास होत होता. आता महाराष्ट्र शासनाचे सर्व नागरी भागांसाठी एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावली अमलात आणली आहे. नवीन नियमांमुळे राज्याच्या गृह निर्माण, व्यावसायिक विकासाला नवीन दिशा प्राप्त होईल.

  श्री. संजय सावजी, सेवानिवृत्त उपसंचालक, नगर रचना विभाग यांनी सांगितले की, एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावली लागू झाल्याने आता पूर्वीचे सगळे नियमांना निष्प्रभावी करण्यात आले आहे. नागपूरसह काही शहरांसाठी वेगळया नियमांचा यात समावेश करण्यात आला आहे. नव्या नियमांमध्ये पार्किंग व इतर अनेक महत्वाचा बाबींचा समावेश केला आहे. त्यांनी पी लाईन, चटई निर्देशांक बददल ही माहिती दिली. श्री. अविनाश पाटिल सहसंचालक, नगर रचना पुणे विभाग म्हणाले की, आता राज्याचा मोठया शहरांमध्ये होणा-या विकास कामांमध्ये काही असमतोल दिसणार नाही तसेच एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावली तयार करतांना महानगरांची आवश्यकतेचा विचार केला आहे.

  श्री. महेश साधवानी, अध्यक्ष क्रेडाई -मेट्रो यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करत विश्वास व्यक्त केला की याचा मोठा लाभ नागरिकांना होईल तसेच विकास कामांची दिशा आणि गति वाढेल.

  श्री. प्रमोद गावंडे, सहा. संचालक, नगर रचना, नागपूर महानगरपालिका यांनी सांगितले राज्य शासनाचे नगर विकास विभागाने राज्यातील सर्व शहरी तसेच ग्रामीण भागासाठी एकसमान एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. सदर नियमावली व्दारे आता राज्यात सर्व ठिकाणी एकसमान नियम लागू झाले आहे.

  कार्यक्रमाचे संचालन श्री. संजय बारई यांनी केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145