| | Contact: 8407908145 |
    Published On : Mon, Dec 14th, 2020

    नंदनवन प्रस्तावित जलकुंभ स्वच्छता १६ डिसेंबर रोजी

    – नेहरू नगर झोनच्या जलकुंभांच्या स्वच्छतेची मोहीम २१ डिसेंबर पर्यंत

    नागपूर, १४ डिसेंबर, २०२०: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी सर्व Description: Description: C:\Users\Sachin Dravekar\Documents\BLUE ESR 1.jpgनागपूरकरांना स्वच्छ व उरक्षित पाणी देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून पुन्हा एकदा वार्षिक जलकुंभ स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. याच मोहिमेंतर्गत मनपा-OCW ११ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान नेहरू नगर झोनमधील सर्व जलकुंभांची स्वच्छता करणार आहेत.

    या दरम्यान नंदनवन प्रस्तावित १ जलकुंभ १६ डिसेंबर (बुधवार), सक्करदरा- ३, १८ डिसेंबर (शुक्रवार), सक्करदरा- २, १९ डिसेंबर -(शनिवार) व सक्करदरा -१ जलकुंभ २१ डिसेंबर (सोमवार) रोजी स्वच्छ करण्यात येतील.

    सर्व जलकुंभ सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान स्वच्छ करण्यात येतील. स्वच्छतेच्या कामामुळे त्या त्या जलकुंभावर अवलंबून असलेल्या भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील. यादरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने मनाप-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

    नंदनवन प्रस्तावित जलकुंभ स्वच्छतेमुळे १६ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बाधित राहणार असलेले भाग: बापू नगर, गुरुदेव नगर, ताजबाग स्लम, हरपूर, सिंधीबन, संतोषी मत नगर व भांडे प्लॉट

    सक्करदरा ३ जलकुंभ स्वच्छतेमुळे १८ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बाधित राहणार असलेले भाग: रुक्मिणी नगर, गुरुदेव नगर, श्रीराम नगर, संजय गांधी नगर

    सक्करदरा २ जलकुंभ स्वच्छतेमुळे १९ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बाधित राहणार असलेले भाग: महालक्ष्मी नगर, श्रीनगर, लाडीकर लेआऊट, जवाहर नगर, जुना सुभेदार लेआऊट, सुर्वे लेआऊट

    सक्करदरा २ जलकुंभ स्वच्छतेमुळे २१ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बाधित राहणार असलेले भाग: आशीर्वाद नगर, बँक कॉलोनी, भांडे प्लॉट, सेवादल नगर, सोलंकीवाडी, जुना सक्करदरा. राणी भोसले नगर, सोनगारी नगर

    मनपा-OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

    For information please do contact @ NMC-OCW’s Toll Free Number 1800 266 9899 at any time.

    Stay Updated : Download Our App
    Mo. 8407908145