मनपाच्या प्राथमिक आरोग्य केन्द्राचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक
नागपूर: केन्द्र शासनाचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागपूर महानगरपालिका व टाटा ट्रस्ट मार्फत संचालित होणा-या मॉडल नागरी प्राथमिक आरोग्य केन्द्र (UPHC) मध्ये दिल्या जाणा-या सेवेबददल प्रशंसा केली आहे. मनपासाठी ही मोठया अभिमानाची बाब आहे, कारण या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली आहे. यापूर्वीही मनपाच्या या प्रकल्पाला आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेमध्ये सुध्दा नागरी क्षेत्राचा उत्कृष्ठ प्रकल्प घोषीत करण्यात आले होते.
टाटा ट्रस्टच्या सहकार्याने नागपूर मनपाच्या वतीने २६ नागरी प्राथमिक आरोग्य केन्द्र संचालित करण्यात येत आहे. या नागरी केन्द्राचे आधुनिकीकरण व बळकटीकरण मनपाच्या जागेवर केले गेले आहे. टाटा ट्रस्ट च्या माध्यमाने स्टाफचे प्रशिक्षण, दर्जेदार रुग्णसेवा देण्याबददलचे प्रशिक्षण, आई.टी. व उपचार आदींची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच औषधे मनपाचा वतीने देण्यात येत आहे.
आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वतीने देशभरातील सर्व अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव व मिशन डायरेक्टर (नॅशनल हेल्थ मिशन) यांनी राष्ट्रीय पातळीवरील आयोजित कार्यशाळेत आरोग्य क्षेत्रातील विविध प्रकल्पाची माहिती घेवून त्यांनी नागपूरच्या नागरी प्राथमिक आरोग्य केन्द्राचे विशेष रुपाने कौतुक केले.