Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jan 14th, 2021

  नागपूरकरांना पाहिजे सुरक्षित रस्ते

  स्मार्ट सिटी नी केले रस्त्यांचे वॉकिंग ‍ऑडिट

  नागपूर : नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशन लिमिटेड यांच्या वतीने “वॉकिंग ‍ ऑडिट” विविध बाजारपेठेत, रस्त्यावर करण्यात आले. केन्द्र शासनाचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालय, आई.टी.डी.पी., स्मार्ट सिटीज मिशन स्वच्छ भारत आणि फिट इंडिया मूवमेंट यांच्या वतीने आयोजित “स्ट्रीटस फार पीपल” चॅलेंज च्या अंतर्गत ऑडिट करण्यात आले होते.

  “स्ट्रीट फार पीपल” चॅलेंज आर्किटेक्ट, शहरी नियोजन आणि अन्य क्षेत्राचे विद्यार्थ्यांसाठी व व्यावसायिकांसाठी मोठी संधी आहे. याच्या माध्यमाने ते आपल्या स्वत:ची डिजाइन आणि संकल्पनेचा विचार कर नागरिकांसाठी सुविधाजनक रस्ते तयार करु शकतात. याचा उददेश पायी चालणा-यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध होणे होय. स्मार्ट सिटी च्या या उपक्रमाला नगरवासियांचे चांगले सहकार्य मिळाले. या उपक्रमाचे नेतृत्व डॉ. प्रणिता उमरेडकर, महाव्यवस्थापक, पर्यावरण विभाग यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस यांच्या मार्गदर्शनात केले.

  स्ट्रीट फार पीपल चॅलेंज स्पर्धा आई.डी.टी.पी.च्या माध्यमाने ऑनलाईन आयोजित करण्यात आली होती. हया स्पर्धांमध्ये विविध क्षेत्राचे तज्ञांची ५० चमूंनी भाग घेतला होता. आर्किटेक्ट, शहरी नियोजन आणि आर्किटेक्चर कॉलेजचे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.

  या “वॉकिंग ‍ ऑडिट” मध्ये “फलैगशिप इंटरवेंशनसाठी” सीताबर्डी आणि महाल रस्त्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच “नेबरहुड इंटरवेंशन” साठी ट्राफिक पार्क आणि सक्करदरा तलावाच्या समोरचा भाग निवडला आहे. या उपक्रमासाठी ज्यांनी आपले नावाची नोंदणी केली आहे त्यांनी कोणत्याही एका साईटची निवड करुन त्यासाठी डिजाईन तयार करायची आहे. स्मार्ट सिटीच्या चमूंनी वॉकिंग ‍ऑडिट करुन त्यातील समस्या, सामर्थ्य आणि भागधारकांची अपेक्षेबददल आपले मत दिले आहे. वॉकिंग ‍ऑडिटची सुरुवात उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. महेश मोरोणे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

  डॉ. प्रणिता उमरेडकर, महाव्यवस्थापक पर्यावरण, राहुल पांडे, मुख्य नियोजक, अमित शिरपुरकर, पराग अर्मल, हर्षल बोपर्डीकर, स्मृती सावणे, प्राची पानसरे आणि सुप्रिया बचाले यांनी याच्यात सहभाग घेतला. आर्किटेक्ट, स्थानिक दूकानदार, संभाव्य खरेदीदार इत्यादींनी आपले मत नोंदविले. त्यांनी सर्वेक्षण मध्ये त्यांचे मत नोंदणी करतांना स्मार्ट सिटी चमूंचे आभार मानले.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145