| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, Dec 14th, 2020

  सायकलिस्ट करिता नागपूर मेट्रो उत्तम पर्याय : अमित समर्थ

  नागपूर – नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. मेट्रो प्रवास सोबत आता आपली स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील उपलब्ध सायकल देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जाण्याकरिता सायकल मेट्रो ट्रेन मध्ये घेऊन जाण्यासंबंधी सेवा सुरु केली असून नागरिकांना याची पसंती मिळत आहे , या अनुषंगाने आज सकाळी प्रसिद्ध सायकलिस्ट अमित समर्थ व चमू ने सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशन दरम्यान सायकल मेट्रो सोबत बाळगून मेट्रोने प्रवास केला.

  नागपूर शहरामध्ये मल्टीमॉडेल इंटिग्रेशन अंतर्गत नवीन सुविधा उपलब्ध झाली आहे. नागपूर मेट्रोने सायकलिस्ट करीत अतिशय चान्गली सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

  एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सायकल घेऊन जाने सोपे झाले आहे तसेच या करता कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त तिकीट काढावे लागत नाही त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा उपयोग करून पर्यावरणपूरक साधनांचा उपयोग करावा असे आवाहन श्री. समर्थ यांनी नागपुरातील सायकलिस्टना केले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145