| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Dec 16th, 2020

  नागपूर शहर सायकल चालकांसाठी सुरक्षित करावे

  – स्मार्ट सिटीच्या सर्व्हेक्षणात नागरिकांनी नोंदविले आपले मत

  नागपूर : नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेवलपमेंट कारपोरेशनच्या माध्यमाने नागपूर मध्ये इंडिया साइकल फॉर चेंज चॅलेंज कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात नागरिकांकडून मिळालेल्या माहिती अनुसार रस्त्यावर सायकल चालविणे अत्यंत असुरक्षित आहे. सायकलसाठी वेगळी लेन ची आवश्यकता आहे. या सर्वेक्षणाचा मुख्य उददेश नागपूर मध्ये सायकलिंग करणा-या लोकांना सुविधा प्रदान करणे, सायकलिंगला प्रोत्साहन देणे हा होता. ही माहिती स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भुवनेश्वरी एस यांनी दिली.

  केन्द्र शासनाचे गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालय अंतर्गत काम करणारे स्मार्ट सिटीज मिशन यांनी इंडिया सायकल फार चेंज चॅलेंज ची घोषणा केली होती. या उपक्रमात नागपूर स्मार्ट सिटीनीसुध्दा सहभाग घेतला होता. कोव्हीड – १९ चा काळात केन्द्र शासनाचे निर्देशानुसार सायकल बददल नागरिकांचे मत जाणण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्व्हेक्षण करण्यात आला होता. या सर्व्हेक्षणात १५३४४ नागरिकांनी भाग घेतला, यामध्ये ८३ टक्के पुरुष आणि १७ टक्के महिलांनी भाग घेतला.

  ऑफ लाईन सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी सायकलस्वारांसाठी रस्त्यावर सुरक्षितेतेचे वातावरण तयार करणे, सायकलची पार्किंगसाठी वेगळी जागा आणि समर्पित सायकल लेन तयार करण्याच्या सूचना केल्या. त्यांनी आपल्या अभिप्रायामध्ये मोठया रस्त्यावर होणारे अपघाताविषयी चिंता व्यक्त करतांना सायकलिंगसाठी सुरक्षित लेन तयार करण्याची विनंती केली आहे. सर्व्हेक्षणात प्राप्त माहितीचे विश्लेषण श्रीमती आरती चौधरी आणि श्री. कुणाल गजभिये यांनी केले.

  नागरिकांनी नोंदविलेले प्रमुख मुददे या प्रकारे आहे :-

  v नागरिकांना सायकल चालविणे बाबत जागृत करणे

  v कार्यालयात अधिका-या पासून निम्नस्तरापर्यंत सर्व कर्मचा-यांनी सायकलचा अवलंब करावा.

  v सायकलस्वारांसाठी वेगळी सायकल लेन तयार करावी.

  v वॉकर स्ट्रीट प्रमाणे सायकल ट्रॅक तयार करावे.

  v रस्त्यावर धावणा-या वाहनांची संख्या कमी करावी.

  v पार्किंगची वेगळी जागा ‍ निश्चित करावी

  v हेलमेट अनिवार्य करण्यात यावे.

  v रस्त्यावर फिरणा-या कुत्रयांवर नियंत्रण करावे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145