| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Dec 16th, 2020

  मुंबई-नागपूर-मुंबई फ्लाईट रोज

  नागपूर : एअर इंडियाची मुुंबई-नागपूर-मुंंबई फ्लाईट आता आठवड्यातून तीन दिवसांऐवजी १८ डिसेंबरपासून रोज उड्डाण भरणार आहे.

  फ्लाईट एआय ६२७ मुंबई-नागपूर सकाळी ६.२० वाजता मुंबई येथून प्रस्थान करेल आणि नागपूरला सकाळी ७.५५ वाजता पोहोचेल तर एआय ६२८ नागपूर-मुंबई सकाळी ९.१० वाजता प्रस्थान करेल. सद्यस्थितीत ही फ्लाईट आठवड्यातून मंगळवारी, गुरुवारी व शनिवारी उड्डाण भरत आहे.

  एअर इंडियाने नागपूर-दिल्ली-नागपूर फ्लाईट दररोज चालविण्याचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवला आहे. सद्यस्थितीत ही फ्लाईट आठवड्यातून तीन दिवसच उड्डाण भरत आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145