कमी दरामध्ये जास्ती अंतर मेट्रोच्या माध्यमाने गाठता येते : गडकरी
– माझी मेट्रो नागपूरच्या वैभवात मानाचा तुरा
नागपुर – नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या ऑरेंज आणि ऍक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरु असून नागरिक याचा वापर करीत आहे. याच पार्श्वभूमीवर आज सेवा सदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. कांचन गडकरी यांनी महा मेट्रोच्या ऍक्वालाईन मार्गिकेवरील झासी राणी मेट्रो स्टेशन ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास केला.
माझी मेट्रो नागपूरच्या वैभवामध्ये मानाचा तुरा आज नागपूरकर अनुभवीत आहे. अतिशय सुंदर,प्रशसनीय आणि कौतुकास्पद अशी व्यवस्था नागपूर मेट्रो मध्ये आहे. सुरक्षितता आणि स्वच्छतेचा उत्तम नमुना मेट्रो मध्ये तसेच स्टेशन परिसरात बघायला मिळते असे उद्दगार श्रीमती.गडकरी यांनी व्यक्त केले. त्या सेवा सदन शिक्षण संस्थेचे कर्मचारी,कार्यकारी मंडळ यांच्या समवेत मेट्रोने प्रवास करीत होत्या त्यांच्या सोबत श्री. बापू भागवत, श्रीमती.इंदूबाला मुकेवार व साधना हिंगवे देखील उपस्थित होते.
मेट्रोमध्ये बसल्यानंतर नागपूर मध्ये आहोत म्हणून असे वाटत नसून सिंगापूर सारख्या शहरामध्ये असल्याचा भास होतो असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. नागपूरच्या जनतेला खरोखर अभिनंदनीय असे वाहतुकीचे साधन उपलब्ध आहे. प्रत्येक नागरिक जाणे – येणे अतिशय कमी दरामध्ये जास्तीत जास्त अंतर गाठू शकतो. नागपूरकरांनी या संधीचा फायदा घ्यावा व पर्यावरनपूरक साधनांचा उपयोग करावा असे आवाहन त्यांनी यावेळी नागरिकांना केले.
मेट्रो मार्गावर अनेक शिक्षण संस्था, औद्योगिक परिसर आहे त्यानी या सेवेचा जास्तीत जास्ती उपयोग करावा महा मेट्रोने चांगली सुविधा नागरिकांनकरिता उपलब्ध करून दिली असून याचा पुरेपूर फायदा नागपूरकरांनी करावा असे त्यांनी नमूद केले. यावेळी श्रीमती.कांचन गडकरी यांनी मेट्रो स्टेशन परिसरातून महा मेट्रोचे महा कार्ड घेऊन मेट्रोने प्रवास केला.